आता विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुरक्षित

Steel-Bridge
Steel-Bridge

किरकटवाडी - खडकवासला धरणामागील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर असलेला सुमारे धोकादायक अवस्थेतील लोखंडी पूल अखेर जलसंपदा विभागाने दुरुस्त केला आहे. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. पाटबंधारे विभागाशी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने हे काम करून घेतले आहे.

यशवंत विद्यालयाजवळ उभारण्यात आलेला पूल पत्रा सडल्यामुळे चालण्यासाठी धोकादायक झाला होता. काही ठिकाणी पत्रा पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे पुलाला मोठी छिद्रे पडली होती. विद्यार्थी, परिसरातील नागरिक, जनावरे अशा सर्वांनाच या पुलावरून चालताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. 
या पुलाच्या दुरवस्थेचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘सकाळ’मधून वृत्त प्रसारित करण्यात आले व पाटबंधारे विभागाचे खडकवासला शाखा उपअभियंता पोपटराव शेलार यांच्याशी संपर्क करून सतत पाठपुरावा केला.

उपअभियंता शेलार यांनी तातडीने धोकादायक पुलाची पाहणी केली व दुरुस्ती करण्यासंदर्भात अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. मंजुरीनंतर ठेकेदारामार्फत पुलाची दुरुस्ती करण्यात आली. मजबूत पत्रा टाकल्याने व पुलाला पुन्हा रंग दिल्याने तीस वर्षे जुना असलेला पूल पुन्हा नव्याने नागरिकांसाठी सुरक्षित झाला आहे. 

पुलाचे काम व्यवस्थित, सुरक्षित व टिकाऊ करण्यासंदर्भात ठेकेदारास सांगितले होते. लहान विद्यार्थी ये-जा करत असल्याने दुरुस्ती करतानाही काळजी घेण्यासंदर्भात सूचित केले होते. पुलाबाबत आम्हाला माहिती दिल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार, असे मत उपअभियंता शेलार यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com