नाट्यप्रेमींसाठी खुषखबर! 1000 रुपयात पाहता येणार 5 नाट्यप्रयोग 

bharat-naty-mandir.jpg
bharat-naty-mandir.jpg

पुणे :  पुणे तिथे काय उणे म्हणतात ना... तेच खरे. पुणे म्हणजे राज्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. पुणेकरांचा नाटक, संगीत, चित्रपट, कवी समेंलन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेले प्रेम सर्वांनाच माहित आहे. पुणेकरांचा हा उत्साह पाहाता पुण्यात सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले जातात. असाच एक प्रयोग भरत नाट्य संशोधन मंदिरतर्फे करण्यात आला आहे. नाट्यप्रेमी पुणेकरांसाठी एक भन्नाट योजना त्यांनी आखली आहे. 

काय आहे ही योजना?
भरत नाट्य मंदिर स्वस्त नाटक योजना २०१९-२०  असे या योजनेचे नाव आहे. एक वर्षात ५ नाट्य प्रयोग नाट्यप्रेमींना पाहता येतील. इतकेच नव्हे तर प्रत्येक नाट्य प्रयोगाच्या दोन प्रवेशिका एक सभासदास मिळणार आहे. हे नाट्यप्रयोग फक्त रविवारी असतील. प्रथम पुष्प २८ जुलै २०१९ ला होणार आहे. 

तुम्हाला काय करायचे आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वार्षिक सभासद वर्गणी फक्त रु. १०००/- भरुन सभासद व्हायचे आहे. 12 जुनपासून नोंदनी सुरु झाली आहे. 

तुम्ही येथे संपर्क साधू शकता
भरत बुकिंग काउंटर वेळ: सकाळी ९ ते ११, सायं. ५ ते ८
संजय डोळे 9422505090
अविनाश ओगले 9422367335
अभय जबडे 9422303676

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com