Corona Updates: पुणे जिल्ह्यात रुग्णांनी पुन्हा ओलांडला दहा हजारांचा आकडा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात ४ हजार ६८ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय ६ हजार ४६ रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांनी (अॅक्टिव्ह पेशंट) रविवारी (ता.२२) पुन्हा दहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ७८५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३३० जण आहेत. दिवसभरात ११ हजार ३६८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

गेल्या २४ तासांत ५८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी आहे. याउलट रुग्णांलयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील पाच, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला नाही.

सोने, हिरे-मोत्याचे दागिने, दीडशे डॉलर अन् अकरा लाख; कर्वेनगरमधून चोरट्यानं लंपास केलं हो!​

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात ४ हजार ६८ कोरोना रुग्ण उपचार
घेत आहेत. याशिवाय ६ हजार ४६ रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात
येत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची
संख्या आता ३ लाख ३६ हजार २१० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख १७ हजार ९८५ कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार २७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३८७ रुग्ण आहेत.

रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये २१५, जिल्हा परिषद क्षेत्रात १६८, नगरपालिका
क्षेत्रात ५८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १४ नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शनिवारी (ता.२१) रात्री
आठ वाजल्यापासून रविवारी (ता.२२) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of active corona patients in Pune district has crossed ten thousand again on 22nd November