पिंपळे सौदागर मध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला

sparrows
sparrows

जुनी सांगवी - जागतिक चिमणी दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज लिनियर गार्डन व रोझलँन्ड सोसायटी परिसरात पक्ष्यांचा ऊन्हाळा आल्दाददायक व्हावा यासाठी खाद्य व पिण्यासाठी पाण्याची भांडी बसविण्यात आली आहेत. चिमणी व ईतर पक्ष्यांना ऊन्हाळ्यात अन्न व पाण्याची चणचण भासते. परिणामी पक्ष्यांचा चिवचिवाट या ऋतुत कमी होतो. अनेकदा चिमणी, कावळा, कोकिळा असे अनेक पक्षी पाण्याविना मृत्यु पावल्याच्या घटना घडतात. पक्ष्यांचा उन्हाळा आल्हाददायक व्हावा यासाठी येथील पक्षीमित्र श्री चंदन चौरसिया व जिग्ना शहा यांच्या पुढाकाराने जागतिक चिमणी दिनानिमित्त रोझलॅन्ड रेसीडेन्सी सोसायटी व लिनियार्ड गार्डन परिसरात झाडे, गच्ची, ईत्यादी ठिकाणी खाद्य व पाण्याची भांडी लावण्यात आली आहेत. तर उन्हापासुन संरक्षणासाठी घरटी बसविण्यात आली आहेत. सध्या दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. अशावेळी पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. तर काहींचा पाण्याअभावी अन्नाअभावी तर काहीवेळा दुषित पाणी पिऊन मृत्यू होतो. 

चिमणीदिनानिमित्त लावण्यात आलेली घरटी,खाद्य व पाण्याच्या भांड्याभोवती चिमणी व ईतर पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला आहे. सोसायटी सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. परिसरात ३२ घरटी, ३० पाण्याची भांडी तर ६० बर्ड फिडर बॉक्स बसविण्यात आली आहेत.

भांडी बसविल्याने चिमणी, कावळा, कबुतर, कोकिळ, राघु व ईतर पक्ष्यांचे दर्शन घडू लागल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उद्यानांमधून, सोसायट्यामंधून हा उपक्रम पुढे राबवायचा आहे. स्थानिक पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमींना यात सामावून घेण्याचा मानस आहे. श्री.चंदन चौरासिया-पक्षीमित्र 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com