लॉकडाऊन काळातही विस्कटली कुटुंबाची घडी; 'ही' आहेत वादाची कारणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 24 मार्च पासून जूनमहिन्याच्या सुरवातीपर्यत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाल्याने कुटुंबातील सर्वच व्यक्ती घरी होत्या. त्यामुळे आधीच वाद असलेले जोडप्यातील खटके उडण्याचे प्रमाण अजूनच वाढते. तर सातत्याने घरच्या व्यक्तीबरोबर संवाद होत असल्याने व त्यातून काही मतभेद झाल्यास राग येण्याचे व चिडचिड होण्याचे प्रकारही वाढले आहेत.

पुणे : कुटुंबातील सर्व मंडळी सतत घरी असल्याने, पूर्वीच्या तुलनेत महिलांची घरातील कामे वाढल्याने, कुटुंबातील पुरुष मंडळीच्या फर्माईशी वाढून कामातील हातभार कमी झाला, लॉकडाऊनमुळे आर्थिक तंगी निर्माण झाल्याने पत्नीकडून केलेली पैशांची अपेक्षा, वाढलेली व्यसनाधिनता या व अशा अनेक कारणांमुळे लॉकडाऊन काळात कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे.

पुणेकरांनो, मॅगी, पाणीपुरीचा स्टॉकच संपला

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 24 मार्च पासून जूनमहिन्याच्या सुरवातीपर्यत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाल्याने कुटुंबातील सर्वच व्यक्ती घरी होत्या. त्यामुळे आधीच वाद असलेले जोडप्यातील खटके उडण्याचे प्रमाण अजूनच वाढते. तर सातत्याने घरच्या व्यक्तीबरोबर संवाद होत असल्याने व त्यातून काही मतभेद झाल्यास राग येण्याचे व चिडचिड होण्याचे प्रकारही वाढले आहेत. मुलांचा ताबा मिळणे, पोटगीची रक्कम मिळण्यास होणारा उशीर, कौटुंबिक वादातील दाव्यात दाखल केलेले विविध अर्ज यामुळे विभक्त झालेले किंवा घटस्फोटच्या मार्गावर असलेल्या जोडप्यातील वाद वाढले आहेत. कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आता संबंधितांना वेळ देऊन ते दाखल करून घेतले जात आहे. त्यामुळे मार्च ते 15 जून पूर्वीचे दावे आता दाखल होत आहेत. लॉकडाऊन पूर्वीचा विचार केला असता दाव्याची संख्या वाढत आहे, असे कौटुंबिक न्यायालय प्रशासनाकडून कळण्यात आले. 

पुण्यात उद्योग क्षेत्रात कोरोनाचे प्रमाण अगदी नगण्य; 'अशी' घेतायेत काळजी

लॉकडाऊन काळात काही कुटुंबातील संवाद वाढला आहे. मात्र सर्वांच्या घरात अशीच परिस्थिती नाही. सतत घरी राहून शुल्लक गोष्टींवरून चिडचिड करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात पुरुष मंडळींच्या फर्माईशी वाढल्याने महिलांवरील कामाचा ताण वाढला आहे. व्यसनाधीन असलेली पुरुषमंडळी दारू मिळण्यास सुरुवात झाल्यापासून घरात वाद घालत आहेत. तर विभक्त झालेल्या किंवा वेगळे होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या जोडप्यातही विविध कारणांमुळे वाद वाढले आहेत.
- अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्षा, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

जानेवारी ते जून दरम्यानची आकडेवारी : 
- यावर्षी जूनअखेर 953 दावे दाखल
- त्यातील 636 अर्ज घटस्फोट, नांदायला जाणे आणि लग्न अवैध असल्याबाबत
- यासर्वात सुमारे 300 दावे घटस्फोटाचे
- पोटगी मिळावी म्हणून 67 अर्ज दाखल
- या काळात एकूण 1 हजार 78 प्रकरणे निकाली 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ही आहेत वादाची कारणे : 
- कुटुंबातील सर्व सदस्य सतत घरी असणे.
- मुलं घरी असल्याने पसारा वाढणे
- महिलांची कामे पूर्वीच्या तुलनेत खूप वाढले
- मदतीला कामवाली बाई नसणे   
- दारू मिळू लागल्याने घरातच व्यसने करणे
- पुरुष मंडळींनी घरात मदत न करणे
- आर्थिक तंगी त्यामुळे पत्नीकडून  पैशाची अपेक्षा 
- नोकरी-धंदा बंद असल्याने आलेले टेन्शन 
- सोशल मीडियाचा वापर वाढल्याने बाळावलेला संशय
- नोकरदार महिलांना घरातील जेष्ठांची अधिक सेवा करावी लागत आहे
- शुल्लक बाबीवरून सासू सुनेतील वाढलेली कुरकुर
- विभक्त पालकांना मुलांना ताबा न देणे
- पतीकडून वेळेवर पोटगी न मिळणे 

 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of complaints filed in family court also increased during the lockdown