
पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांवर उपचार करण्यासाठी पुणे महापालिकेने दळवी रुग्णालय आणि रक्षक नगर स्टेडीयम येथील कोरोना उपचार केंद्र (कोवीड केअर सेंटर) सुरू केले जाणार आहेत.
पुण्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने कोरोना उपचार केंद्र पुन्हा होणार सुरू
पुणे - शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांवर उपचार करण्यासाठी पुणे महापालिकेने दळवी रुग्णालय आणि रक्षक नगर स्टेडीयम येथील कोरोना उपचार केंद्र (कोवीड केअर सेंटर) सुरू केले जाणार आहेत. मंगळवारपासून हे दोन्ही केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पुण्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने रुग्णालयांसह, वसतीगृहांमध्ये उपचार केंद्र व विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने ते केंद्र बंद करून कोरोना बाधितांना त्यांच्या घरातच विलगीकरण करण्यावर भर देण्यात आला. रुग्ण संख्या वाढत असल्याने मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्यास सुरवात केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शनिवारी (ता. ६) शहरात ९३० नवे रुग्ण आढळले असून, सध्या ६ हजार ४६० सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या वाढत गेल्यास गंभीर रुग्णांची संख्याही वाढणार आहे. तसेच घरामध्ये विलगीकरणाची सुविधा नसेल तर नागरिकांची अडचण होऊ शकते यादृष्टीने कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या दळवी दवाखान्यात ७५ आॅक्सिजन बेडची क्षमता आहे, तेथे कोरोना उपचार केंद्र पुन्हा सुरू केले जाणार आहे. तर रक्षक नगर स्टेडीयम येथे सुमारे ३०० बेडची व्यवस्था केली जाणार आहे.
पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी : सत्य लपवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकावर दबाव : जगदीश मुळीक
सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘सध्या घरातच विलगीकरण करण्यावर पालिकेचा भर होता. पण कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने दळवी रुग्णालय आणि रक्षकनगर स्टेटियम येथे मंगळवारपासून कोरोना उपचार केंद्र सुरू केले जाणार आहे. शहरात सध्या कोरोना चाचणी केंद्रांची संख्या १९ झाली आहे. हडपसर आणि वारजे येथे केंद्र सुरू केले आहे. तर बिबवेवाडी केंद्रावर जास्त जणांची चाचणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या शहरात ८ हजारापर्यंत चाचणीसाठीचे नमुने घेतले जात आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी सल्लागार समिती ठरविणार उपाययोजना
कोरोना रुग्णांची संख्या नऊशे पार
गेल्या तीन दिवसात पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची संख्या नऊशे पार गेली आहे. शनिवारी ९३० रुग्ण सापडले आहेत. जानेवारी महिन्याच्या अखेरीस रोज लागण होणाऱ्यांची संख्या १०० पर्यंत खाली आली होती. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने ३००, ४००, ६०० अशा टप्प्याने रोज रुग्णसंख्या वाढत ती नऊशेच्या पुढे गेली आहे.
Edited By - Prashant Patil
Web Title: Number Corona Cases Increasing Pune Corona Treatment Center Reopened
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..