Coronavirus : पुणेकरांनो, कोरोनामुक्तांची संख्या पोचली अडीच लाखांजवळ!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 624,
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 635, नगरपालिका क्षेत्रात 187 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 101 नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कोरोनामुक्तांची संख्या वाढू लागली असून मागील तीन दिवसांपासून रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा अडीच लाखांच्या जवळ पोचला आहे. शुक्रवारी (ता.2) दिवसभरात जिल्ह्यात 2 हजार 571 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुक्त रुग्णांना उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा; शहरात सुरू होणार 'पोस्ट कोविड ओपीडी' सेंटर!​

शुक्रवारच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 1 हजार 24 जणांचा समावेश आहे.
दिवसभरात 2 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 89 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 624,
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 635, नगरपालिका क्षेत्रात 187 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 101 नवे रुग्ण सापडले आहेत.

दिवसभरात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक 43 जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील 14, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 17, नगरपालिका क्षेत्रातील 14 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही गुरुवारी (ता.1) रात्री 9 वाजल्यापासून शुक्रवारी (ता.2) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

'आयपीएल' बेटींग सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी घेतली लाच; 'एसीबी'नं दोघांना घेतलं ताब्यात

कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 209, पिंपरी
चिंचवडमधील 1 हजार 40, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 420, नगरपालिका क्षेत्रातील 101 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 29 जण आहेत. शुक्रवार अखेरपर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 687 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार 720, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 337, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 66, नगरपालिका क्षेत्रातील 386 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 178 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 2284 जण आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona free in Pune district has reached close to two and a half lakhs