पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची तीन लाख 22 हजार 820 झाली आहे. त्यापैकी तीन लाख दोन हजार 812 रुग्ण बरे झाले आहेत.

पुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच लाख दोन हजार 303 झाली आहे. त्यापैकी चार लाख 67 हजार 141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 21 हजार 142 इतकी आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. विभागात शनिवारअखेर कोरोना बाधित 14 हजार 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. 

महत्त्वाची बातमी : अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन वर्ग सुरू होणार!​

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची तीन लाख 22 हजार 820 झाली आहे. त्यापैकी तीन लाख दोन हजार 812 रुग्ण बरे झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12 हजार 243 आहे. जिल्ह्यात सात हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.80 टक्के आहे.

विभागातील इतर जिल्ह्यातील स्थिती : 
सातारा जिल्हा : 

कोरोनाबाधित रुग्ण - 46 हजार 219 
बरे झालेले रुग्ण - 41 हजार 380 
उपचार घेत असलेले रुग्ण - 3 हजार 303 
मृत्यू - 1 हजार 536 

नागरिकांनो, ही बातमी तुमच्यासाठी; मास्कच्या नव्या किंमती जाणून घ्या!​

सोलापूर जिल्हा : 
कोरोनाबाधित रुग्ण - 40 हजार 210 
बरे झालेले रुग्ण - 35 हजार 881 
उपचार घेत असलेले रुग्ण - 2 हजार 885 
मृत्यू - 1 हजार 444

सांगली जिल्हा : 
कोरोनाबाधित रुग्ण - 44 हजार 982 
बरे झालेले रुग्ण - 41 हजार 586 
उपचार घेत असलेले रुग्ण - 1 हजार 761 
मृत्यू - 1 हजार 635 

कोल्हापूर जिल्हा : 
कोरोनाबाधित रुग्ण - 48 हजार 72 
बरे झालेले रुग्ण - 45 हजार 482 
उपचार घेत असलेले रुग्ण - 950 
मृत्यू - 1 हजार 640

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of corona infected patients in Pune division has reached five lakh