नागरिकांनो, ही बातमी तुमच्यासाठी; मास्कच्या नव्या किंमती जाणून घ्या!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

- मास्कचा वापर अनिवार्य असून उपरोक्त दरानुसारच दोन पदरी, तीन पदरी आणि एन-95 मास्कची विक्री करावी. 
- साथरोग नियंत्रण कायदा अमलात असेपर्यंत हे विक्री मूल्य लागू राहील. 

पुणे : आव्वाच्या सव्वा भावाने मास्कची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आता अंकुश लागणार आहे. कारण अन्न व औषध प्रशासनाने मास्कच्या दर्जानुसार जीएसटीसह विक्री मूल्य निश्‍चित केले आहे. दोन पदरी सर्जिकल मास्क हा दोन रुपयांत, व्ही आकारातील एन-95 मास्क हा 19 रुपयांत आणि सर्वांत महाग मॅग्नम कप आकारातील एन-95 हा मास्क 49 रुपयांत विकण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

- Success Story : २१ व्या वर्षी तो बनला न्यायाधीश!

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. लॉकडाउन लागल्यानंतर केंद्र सरकारने हॅन्ड सॅनिटायझर आणि मास्कच्या किमतींवर नियंत्रण आणले होते. परंतु 30 जून रोजी हे नियंत्रण संपुष्टात आले. त्यानंतर सातत्याने मास्कच्या किमतीमध्ये वाढ होत असून, याचा अंतिमतः सामान्य जनतेला भुर्दंड भोगावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने आरोग्य मंत्रालयासोबतच्या बैठकीत साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार हा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्यक्ष मास्कच्या उत्पादन खर्च आणि लेखा परीक्षकांच्या साहाय्याने ही किंमत निश्‍चित केली आहे.

...तर मग संमतीनेच घटस्फोट घेऊ; कोरोनाने बदलला जोडप्यांचा कल!

असा आहे शासनाचा निर्णय :
- मास्कचा वापर अनिवार्य असून उपरोक्त दरानुसारच दोन पदरी, तीन पदरी आणि एन-95 मास्कची विक्री करावी. 
- साथरोग नियंत्रण कायदा अमलात असेपर्यंत हे विक्री मूल्य लागू राहील. 
- राज्यातील सर्व उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांना याच किमतीत मास्क विकावे लागतील. 
- मास्कची निर्धारित कमाल किंमत दर्शनी भागावर लावणे अनिवार्य 
- या प्रकरणी काही तक्रार उद्भवल्यास जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा अन्न व औषध प्रशासनाकडे करावी. 
- शासकीय आणि खासगी रुग्णालये, कोवीड सेंटर आदींना मास्कचा पुरवठा 70 टक्के दराने उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. 

Positive Story : मी आत्महत्याच करणार होतो, पण तेवढ्यात... (व्हिडिओ)​

अशा आहेत मास्कच्या किमती : 

मास्कचा तपशील किंमत (जीएसटीसह) 
नॉइश प्रमाणीत व्ही आकाराचा एन-95 19 रुपये 
नॉइश प्रमाणित थ्रीडी एन-95 25 रुपये 
बीना वॉल्वचा एन-95 28 
नॉइश प्रमाणित कपाच्या आकाराचा बीना वॉल्वचा एन-95 12 ते 49 रुपये 
पीपीएफ-2 (आयएसआय प्रमाणित) 12 रुपये 
दोन पदरी सर्जिकल मास्क बीना लूपचा 3 रुपये 
तीन पदरी मेल्ट ब्लाउन सर्जिकल मास्क 4 रुपये

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of masks announced by the Food and Drug Administration