esakal | बारामतीतील गोविंदबागेत कोरोनाची एन्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

corona logo1.jpg

तीन पुरुष, एक महिला कर्मचारी पॉझिटीव्ह; रुग्णसंख्या पोचली 473वर 

बारामतीतील गोविंदबागेत कोरोनाची एन्ट्री

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामतीत शुक्रवारी 11 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून रुग्णसंख्या 473 झाली आहे. यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेतील चार कर्मचारीही पॉझिटीव्ह आढळले आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री रुई येथील रुग्णालयात बारामतीतील उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 25 झाली आहे. 
बुधवारी घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतिक्षेत असलेल्या 38 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्या पैकी माळेगाव येथील गोविंदबागेतील तीन पुरुष व एक महिला कर्मराची असे चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. उर्वरित 34 रिपोर्ट निगेटीव्ह आहेत.

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

गुरुवारी घेतलेल्या 138 नमुन्यांपैकी 74 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 64 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तसेच बारामतीतील खासगी प्रयोग शाळेमध्ये घेण्यात आलेल्या शहरातील तीन जणांचे अहवाल रात्री उशिरा अँटीजेन पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या 473 झाली आहे. बारामतीत आजवर 248 रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन ठणठणीत बरे झाले असून 197 जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 


'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत   

गणेशोत्सवावर पोलिसांचे निर्बंध 
कोरोनामुळे गर्दी होऊन संसर्ग वाढू नये या उद्देशाने पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कोठेही मंडप उभारण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. गणेशमूर्तीची स्थापना मंदिर किंवा पक्‍क्‍या बांधकाम असलेल्या ठिकाणी करण्यात यावी, गणेशमूर्तीची उंची चार फूटांहून अधिक असता कामा नये, प्रतिष्ठापना व विसर्जनाच्या वेळेस गर्दी करू नये किंवा मिरवणूक काढू नये, प्रतिष्ठापना तसेच आरतीच्या वेळेस पाचहून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, प्रतिबंधित क्षेत्रात गणेशमूर्ती बसविण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचेही शिरगावकर यांनी नमूद केले.