बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी : कोरोना रुग्णांच्या आकड्यात घट पण...

मिलिंद संगई
Monday, 24 August 2020

160 नमुन्यांपैकी 15 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. रुग्णांचे प्रमाण किंचीत घटू लागल्याचे हे निदर्शक आहे. एकीकडे तपासण्यांचा वेग वाढला असून रुग्ण संख्या घटू लागणे हे दिलासादायक म्हणावे लागेल. 

बारामती (पुणे) : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आज किंचीत घटला. आज दिवसभरात 15 रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने आता बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 556 वर जाऊन पोहोचली आहे. आज 160 नमुन्यांपैकी 15 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. रुग्णांचे प्रमाण किंचीत घटू लागल्याचे हे निदर्शक आहे. एकीकडे तपासण्यांचा वेग वाढला असून रुग्ण संख्या घटू लागणे हे दिलासादायक म्हणावे लागेल. 

केंद्र सरकारच्या धोरणावर अजित पवारांचा सावध पवित्रा; सरसकट वाहतुकीबाबत वेगळा निर्णय घेणार?​
काल बारामती मध्ये 102 नमुने आरटीपीसीआर तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 97 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर बारामती शहरातील 2 व ग्रामीण भागातील मूर्टी येथील एक असे तीन रुग्णांचा अहवाल आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आला.
दरम्यान आजपासून बारामतीतील ग्रामीण रुग्णालय रुई येथे शासकीय रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली. या अंतर्गत आज संध्याकाळपर्यंत 38 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले,  त्यापैकी  बारामती शहरातील तीन व ग्रामीण भागातील माळेगाव व मूर्टी येथील प्रत्येकी एक असे पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

वरसगाव ओव्हरफ्लो; खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला

आज दिवसभरात बारामतीमध्ये खासगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 20 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी बारामती शहरातील चार व ग्रामीण भागातील तीन असे सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान शहरातील भोई गल्ली येथील एका सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा पुणे येथे उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाल्याने बारामतीतील कोरोना मृतांची संख्या 27 झाली आहे.  

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 310 झाली असून सध्या उपचाराखालील रुग्ण 229 इतके आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान लवकरच बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातही रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु करण्यात येणार आहेत. या मुळे रुई व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तपासणीचा ताण काहीसा कमी होण्यास मदत होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in Baramati declined slightly