esakal | बारामतीत समूह संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला; कोरोनाग्रस्तांची संख्या साडेतीनशेच्या घरात!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Patients

शुक्रवारपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुई येथील केंद्रावरचा ताण काहीसा कमी झाला.

बारामतीत समूह संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला; कोरोनाग्रस्तांची संख्या साडेतीनशेच्या घरात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : शहरातील कोरोनाग्रस्तांमध्ये आता समूह संसर्ग (Community Infections) अधिक होतो आहे, असे अहवालावरून दिसून येत आहे. आज पुन्हा एकदा २१ जण कोरोनाबाधित आढळल्याने शहराच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने साडेतीनशेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आज बारामतीची रुग्ण संख्या ३४७ वर पोहोचली आहे. 

काल बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९३ नमुने, तर खाजगी प्रयोगशाळेत ६५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

74th Independence Day: मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत होऊ शकतो मोठा निर्णय; पंतप्रधान मोदींनी दिले संकेत

त्यामध्ये बारामती शहरातील भोई गल्ली, म्हाडा कॉलनी, ख्रिश्चन कॉलनी, एमआयडीसी बारामती, फलटण रस्ता, अशोकनगर, देसाई इस्टेट, मेडद  येथील पाच, पवईमाळ येथील एकाच कुटुंबातील चार रुग्ण, मळद, झारगडवाडी, खांडज, खताळपट्टा ढेकळवाजी या ग्रामीण भागातील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, शुक्रवारपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुई येथील केंद्रावरचा ताण काहीसा कमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल पहिल्याच दिवशी ४२ नमुने घेण्यात आले. या ठिकाणी ज्यांचे नमुने घेतले जातात, त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच विलगीकरणात ठेवले जाते, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

अजित पवारांची मोठी घोषणा; ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटीजेन टेस्ट किट देणार!​

समूह संसर्ग अधिक होऊ लागल्याचे गेल्या तीन दिवसात समोर येत आहे. कुटुंबातील एकाहून अधिक व्यक्तींना परस्परांमुळे संसर्ग झाला असल्याचे दिसत आहे. विशेषतः बाहेरगावी जाऊन आलेल्यांना आणि त्यांच्या संपर्कातील कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे येत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी, असेही आवाहन त्यांनी केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)