corona
corona

मुळशीकरांनो, तोंडाला मास्क हवाच...कोरोना रुग्ण वाढतायेत डझनाने 

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यात आज १२ नवीन  कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या आता ८३ झाली आहे.  यापूर्वी ३२ रुग्ण बरे झालेले असून, अद्याप एकही कोरोनग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. एक कोरोनाबाधित महिला रुग्ण गंभीर अवस्थेत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजित कारंजकर यांनी दिली. 

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत
 
मुळशी तालुक्यात काल सहा रुग्ण सापडले होते. आज त्यात बारा रुग्णांची भर पडली असून, आजपर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे. गेल्या केवळ पंधरा दिवसांत पिरंगुट येथील कोरोनाबाधितांची संख्या पाचवर पोचली आहे. लॅाकडाउन शिथिल झाल्याने 
परिसरात नागरिक व ग्राहकांनी सोशल डिस्टंसचा बोजवारा वाजविल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्यापही मास्क न वापरता घराच्या परिसरात ग्रामस्थ फिरताना दिसतात. याशिवाय परिसरातील कामगार या कोरोनाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. कामगारांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढत आहे.

डॅा. कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  आज संध्याकाळपर्यंत तालुक्यात पिरंगुट येथे तीन पुरुष रुग्णांना कोरोना झाला आहे. 
उरवडे येथही  तीनजणांना कोरोना झाला असून, त्यात एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. भूगाव येथे दोनजणांचे कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आले असून त्यात एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. सूस येथील तिघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असून, तेथील दोन पुरुष व एक महिला कोरोनाबाधित आहे. बावधन येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.  

काल तालुक्यातील सहा जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात  माले येथील एक पुरुष , माळेगाव येथील एक पुरुष व एका महिला, मारूंजी येथील एक महिला, तर हिंजवडी येथील एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे आज तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा त्र्याऐंशीवर पोचला आहे.  

मुळशी तालुक्यात हिंजवडी येथे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वाब घेण्याचे सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची स्वॅाब चाचणी घेण्यासाठी त्यांच्या प्रवासाची सोय म्हणून तसेच तातडीच्या गरजेसाठी प्रशासनाने दोन खासगी रुग्णवाहिका अधिग्रहित केलेल्या आहेत.
- डॉ. अजित कारंजकर
मुळशी तालुका आरोग्य अधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com