esakal | बारामतीत कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून प्रशासन उतरले रस्त्यावर

बोलून बातमी शोधा

बारामतीत कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून प्रशासन उतरले रस्त्यावर}

कोरोना रुग्णांच्या संख्येने सलग दुस-या दिवशीही पन्नाशी गाठल्यानंतर आज प्रशासन रस्त्यावर उतरले.

बारामतीत कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून प्रशासन उतरले रस्त्यावर
sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोना रुग्णांच्या संख्येने सलग दुस-या दिवशीही पन्नाशी गाठल्यानंतर आज प्रशासन रस्त्यावर उतरले. तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी आज कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या मात्र गृहविलगीकरणातील आठ रुग्णांना शोधून त्यांची रवानगी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात करण्यात आली. 

नक्षलवादी ते रिक्षा ड्रायव्हर; संघर्षमय आयुष्याने थक्क करणाऱ्याला दिलंय TMC ने...

बारामतीत आज कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 होता, काल हा आकडा 53 इतका होता. या आकड्याने पन्नाशी ओलांडल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

आज नगरपालिकेच्या पथकांनी विनामास्क फिरणा-यांवर जोरदार कारवाई केली. आज एकाच दिवसात सकाळच्या सत्रात तीस हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली गेली. दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याबद्दलही नगरपालिकेने आज कारवाईचे अस्त्र उगारले होते. स्वताः तहसिलदार व मुख्याधिका-यांनी फिरुन प्रबोधन करण्याचाही प्रयत्न केला. नगरपालिका, महसूल, पोलिस, आरोग्य विभागाने एकत्र येत आज कारवाई केली. 

कोरोनाचे संकट वाढू लागल्याने आज प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी एकत्र आले होते. आज रविवार असूनही अधिकारी रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसले. अनेक जण बिनधास्त विनामास्क फिरत होते, अशांना आज दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. अचानक कोठेही मास्कची तपासणी होऊ शकत असल्याने प्रत्येकाने मास्कचा वापर अनिवार्यपणे करणे गरजेचे असल्याचे मुख्याधिका-यांनी सांगितले. 

दरम्यान बारामती शहर व तालुक्यात लसीकरण मोहिम सुरु आहे. महिला ग्रामीण रुग्णालयात तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधूनही लसीकरण सुरु आहे. 

नक्षलवादी ते रिक्षा ड्रायव्हर; संघर्षमय आयुष्याने थक्क करणाऱ्याला दिलंय TMC ने...

(संपादन : सागर डी. शेलार)