लोणी काळभोर, उरुळीकांचन, मांजरी परिसरातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ

लोणी काळभोर, उरुळीकांचन, मांजरी परिसरातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर, उरुळीकांचन, मांजरी बुद्रुकसह पूर्व हवेलीत मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ जाणवू लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी उरुळी कांचन, लोणी काळभोर व हडपसर परीसरातील रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने, नागरीकांना अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा पुन्हा एकदा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांसह पत्रकारांच्या माध्यमातून बेडसाठी वशिला लावूनही, बेड मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची अवस्था अतिशय दयनीय झाली.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, कोरोनाची अतीतीव्र, तीव्र व मध्यम स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या एकुण रुग्णसंख्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चालल्याने, अशा रुग्णांच्यासाठी व्हेंटीलेटर व ऑक्सिजनयुक्त बेडची मागणीही अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच एखाद्या रुग्णाला बेड मिळालाच तर,  संबधित रुग्णासाठी रेमडेसिव्हीर या इंजेक्शनसाठी नातेवाईकांना रात्रीअपरात्री उरुळी कांचन, लोणी काळभोरपासून पुण्यात धावाधाव करावी लागत आहे. पुर्व हवेलीत अतिशय गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनीधी, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्र येऊन, नागरीकांच्या आरोग्य समस्या सोडवाव्यात अशी मागणी पुर्व हवेलीमधील नागरीकांनी केली आहे.

पुर्व हवेलीत लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, थेऊर व कदमवाकवस्ती या पाच प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत मागील चार दिवसांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. सरकारकडून नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात संदर्भात वारंवार सूचना देऊनही, नागरीक मात्र कोरोनाचा व आपला काय संबध अशा स्थितीत वावरत आहेत.

पोलिस यंत्रणा रस्त्यावर उतरली असली तरी, पोलिस आले की नागरीक मास्क लावण्याचे नाटक करत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस आले की मास्क तर पोलीस गेले की मास्क काढून नागरीक दिवसभर फिरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पूर्व हवेलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे. त्यामुळे कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळेच कोरोना रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. लोणी काळभोर पोलिस, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी वारंवार नागरिकांना सूचना देताना दिसत आहेत, मात्र लोक त्यांना केराची टोपली दाखवत असल्याचे विदारक चित्र आहे.

दरम्यान, पुर्व हवेलीमधील अत्यवस्थ रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात पोचली असून, यातील चाळीस टक्क्याहुन अधिक रुग्णांना ऑक्‍सिजन देण्यात येत आहे. तुलनेने लक्षणेविरहीत किंवा सौम्य लक्षणे असल्याने घरी विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली, तरी शरीरातील ऑक्‍सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्‍टर देत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील बेड भरत आहे. कोरोना बाधितांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे ज्या व्यक्तीला कोरोना झाला अशा व्यक्तीच्या नातेवाईकांना घरीही जाता येत नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांची विदारक अवस्था सध्या पूर्व हवेलीत पहायला मिळत आहे.  

रेमडेसिव्हीरसाठी पळापळ-कोरोनाची अतीतीव्र, तीव्र लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांना डॉक्टर रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्याची शिफारस मोठ्या प्रमानात करत आहेत.त मात्र बाजारात रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक धावपळ करावी लागत आहे. उरुळी कांचन व परीसरातून रोज वीस ते पंचवीस रुग्णांचे नातेवाईक रात्री-अपरात्री रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुणे शहर व पिंपरी-चिंचवड हद्दीत हेलपाटे मारत असल्याचे दिसून येत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी आरोग्य विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना फोन करुनही इंजेक्शन मिळत नसल्याने नागरीक आपले पेशेंट मरेल या भितीने पळापळ करत असल्याचे चित्र सध्या पुर्व हवेलीत दिसून येत आहे. 

कोरोना केअर सेंटर पुढील चोवीस तासात सुरु होणार- कोरोना बाधीत रुग्णांच्यासाठी बेड उपलब्धतेबद्दल बोलता्ना हवेलीचे अतिरिक्त तहसिलदार विजयकुमार चोबे म्हणाले, ''पुर्व हवेलीत मागिल कांही दिवसापासून कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन, पुढील 24 तासांच्या आत वाघोली (300 बेड, नऱ्हे (300 बेड) व लोणी काळभोर (200) बेडची अशी तीन कोविड कोरोना सेंटर सुरु करण्यात ये्णार आहेत. यामुळे पुर्व हवेलीत पुढील चोवीस तासात पाचशेहून अधिक बेड वाढणार आहेत. तर यापुढील गरज भासल्यास, लोणी काळभोर येथे आनखी 200बेड वाढवण्याबद्दल चर्चा सुरू आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com