जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची साठीकडे वाटचाल 

दत्ता म्हसकर
सोमवार, 29 जून 2020

जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसांपासून वाढत असल्याने चिंता देखील वाढत चालली आहे.

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील निरगुडे येथे आज कोरोनाबाधित महिला आढळून आल्याने तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ५९ झाली आहे. यापैकी ३२ जण बरे झाले आहेत, तर २५ जण उपचार घेत आहेत. औरंगपूर व मोकासबाग येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 
लेण्याद्री येथील कोविड केंद्रात १८, तर पुणे येथे ७ जण उपचार घेत आहेत. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसांपासून वाढत असल्याने चिंता देखील वाढत चालली आहे. जुन्नर शहरात दुसरा रुग्ण आढळून आला आहे. उंब्रज, ओतूर, आळे, सावरगाव, जुन्नर, निरगुडे येथील रुग्णांचे संपर्कातील एकूण ९५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्नर तालुक्यातील गावनिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : डिंगोरे- १  (बरा), सावरगाव- ५ (बरे), मांजरवाडी- २ (बरे), पारुंडे- ३ (बरे), आंबेगव्हाण- २ (बरे), धोलवड- ३ (बरे), धालेवाडीतर्फे मिन्हेर- १ (बरा), विठ्ठलवाडी वडज- १ (बरा), शिरोलीतर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी- १ (बरा), कुरण- १ (बरा), 
चिंचोली- ३ (बरे), ओतूर- २ (बरा), जुन्नर- १ (बरा), राजुरी- १ (बरा), नवलेवाडी- १ (बरा), धामणखेल- १ (बरा), कुसूर- १. मृत्यू : औंरगपूर- १ (मृत्यू),  मोकासबाग- १ (मृत्यू), एक्टिव्ह : बोरी- ३, खामुंडी- ७, खानापूर- ३, शिरोली खुर्द- ३, उंब्रज नंबर एक- १. धनगरवाडी- १, ओतूर- १, वारूळवाडी- १, विठ्ठलवाडी- १, संतवाडी- १, वारुळवाडी- १, जुन्नर- १, निरगुडे- १.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in Junnar taluka has gone up to six