खेड तालुक्यात कोरोनाचा कहर, रुग्ण संख्येनी ओलांडली शंभरी...

राजेंद्र सांडभोर
सोमवार, 29 जून 2020

खेड तालुक्यादत गेल्या ११ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. विशेषतः गेल्या ४ दिवसात ४१ रुग्ण वाढले आहेत.

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या ४ दिवसात लक्षणीयरीत्या वाढले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येने शतक गाठले असून, एकूण संख्या १०२ झाली आहे. 

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

खेड तालुक्यादत गेल्या ११ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. विशेषतः गेल्या ४ दिवसात ४१ रुग्ण वाढले आहेत. आज राजगुरुनगरला २ जण पॉझिटिव्ह आढळले, तर चाकणला काल २ जण पॉझिटिव्ह आढळले असून, तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण व आळंदी या शहरांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे. तसेच, काल कडाच्यावाडीतील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३ वर गेली आहे.

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

मुंबई आणि पुणे कनेक्शनमधून खेड तालुक्यात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. कोरोनाचा फैलाव सुरु झाला तरी खेड तालुका पहिल्या अडीच महिन्यात कोरोनामुक्त होता. पण, १५ मे रोजी पुणे कनेक्शनमधून पहिला रुग्ण सापडला आणि तेथून रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात मुंबईहून आलेले किंवा त्यांच्या सान्निध्यात आलेले लोक पॉझिटिव्ह आढळत गेले. जून महिन्यात लॉकडाउन बंधने शिथिल झाल्यावर पुणे कनेक्शनमधून आणि विशेषतः कंपनी संपर्कातून रुग्ण वाढू लागले. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

खेड तालुक्यात १५ मे रोजी १ रुग्ण होता. त्यानंतर तालुक्यात १८ जून रोजी ५१ कोरोनाबाधित झाले होते. गेल्या चार दिवसांत तर कहर झाला असून, २५ जून रोजी ५८ वरून रुग्णसंख्या आज ९९ वर आले आहे. चाकणजवळच्या राक्षेवाडी, कडाचीवाडी, खराबवाडी, नाणेकरवाडी आणि देहूजवळची येलवाडी या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंपनीने खबरदारी न घेतल्याचा फटका
आळंदीजवळच्या सोळू गावात काल ९ रुग्ण आढळले. हे सर्वजण तिथल्या एका कंपनीत काम करत असून, कोरोनाबधित सापडलेल्या उरूळी कांचन परिसरातून येतात. कंपनीने खबरदारी न घेतल्याने ही परिस्थिती ओढविली आहे. चऱ्होली येथे आढळलेला रुग्ण काल मुंबईहून आलेला असून, सुरक्षारक्षकाने मनाई केल्यानंतरही तो बळजबरीने तेथे राहिला होता. काल सांडभोरवाडी येथे १ कोरोनाबाधित आढळला. आज राजगुरूनगर येथें २, चाकणच्या राक्षेवाडीत ३, खराबवाडीत २, नाणेकरवाडीत २, वडगाव घेणंद येथे १ आणि चऱ्होली येथे १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in Khed taluka is one hundred