अबब ! कोथरुडने गाठला हजाराचा आकडा

जितेंद्र मैड
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोरोनाने सगळ्या पुण्यात धुमाकूळ घातलेला असताना ग्रीन झोन मध्ये असलेल्या कोथरुडमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या हजारा पर्यंत पोहचली आहे. संध्याकाळी सहा वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोथरुडमधील आजवरची कोरोनाग्रस्तांची संख्या 987 इतकी झाली असून 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोथरुड (पुणे) : कोरोनाने सगळ्या पुण्यात धुमाकूळ घातलेला असताना ग्रीन झोन मध्ये असलेल्या कोथरुडमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या हजारा पर्यंत पोहचली आहे. संध्याकाळी सहा वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोथरुडमधील आजवरची कोरोनाग्रस्तांची संख्या 987 इतकी झाली असून 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 635 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून कोरोनावर उपचार सुरु असणारांची संख्या 335 इतकी आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 1484 आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ व त्यांचे कुटुंबिय कोरोनाबाधित झाले होते. महापौर कोरोनातून सुखरुप बाहेर पडले आहेत. भाजपच्या नगरसेविका वासंती जाधव व त्यांचे कुटुंबिय कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समाज माध्यमावर झळकले. सध्या जाधव कुटुंबिय एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.

‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ प्रमाणपत्र...

याबाबत अविनाश दंडवते म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी सरकारने जे नियम व अटी घातल्या त्यांचे आम्ही काटेकोर पालन केले. पण महापालिकाच नियमांचे पालन करत नाही असे चित्र आहे. लोकांशी संपर्क येवू नये म्हणून वीज मंडळाने मीटर रीडींग घेणे टाळले असताना महापालिकेने मात्र पाण्याच्या मीटरचे रीडींग घ्यायला लोक पाठवले आहेत. दुसरीकडे होमिओपॅथीच्या गोळ्या वाटण्याचे सार्वजनिक कार्यक्रम जेथे झाले त्या भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत. हे असेच राहीले तर कोरोना कसा आटोक्यात येईल. सचिन धनकुडे म्हणाले की, कोथरुडच्या काही भागातील मुख्य रस्ते पत्रे लावून बंद केले आहेत. हे कोणत्या नियमात धरुन बसते. जर एवढा बंदीस्तपणा करुन सुध्दा कोरोनाला अटकाव होत नसेल तर नियोजनात काहीतरी त्रुटी आहे.

पुण्यात आता 'ही' सरकारी यंत्रणा होणार सुरु; ग्राहकांना मिळणार दिलासा    

लोकांना वेठीस धरण्यापेक्षा नियोजन सुधारण्याची गरज आहे. गुजराथ कॉलनी, मुठेश्वर गणपती ते सागर कॉलनी, कुमार परिसर असे मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत.
संदीप कुंबरे म्हणाले की, सुतारदरा येथे जाणारा रस्ता बंद केला आहे. जर या भागात काही आपत्तीजनक घटना घडली तर येण्याजाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. पत्रे तोडून गाडी आत आणायला वा बाहेर काढायला बराच वेळ जाईल. गुरे बंदिस्त करावे तशा वस्त्या बंदीस्त करणे योग्य नाही. आपत्तीच्या काळात रुग्णवाहिका वा अग्नीशमनची गाडी जाईल असे नियोजन हवे.

कोथरुड मधील कोरोना रुग्णांची संख्या
प्रभाग 10 कोथरुड डेपो, बावधन- 276
प्रभाग 11- शिवतीर्थ नगर, रामबाग कॉलनी- 468
प्रभाग 12- मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी- 243
आजवरचे एकूण रुग्ण- 987


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in Kothrud exceeds one thousand