मुळशीत कोरोनाला रोखण्यासाठी या सुविधांची गरज 

corona1
corona1

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आज साडेसातशेचा आकडा गाठला. आज तालुक्यात नवीन १६ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ७५० झाली आहे. मात्र, हिंजवडी येथील विप्रो केंद्रात समाधानकारक सुविधा नाहीत. तेथे मनुष्यबळ, तंत्रज्ञ व डॅाक्टरांची संख्या कमी आहे. येथे तातडीने डॅाक्टरांची नेमणूक करावी आदी सूचना व मागण्या तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींनी केली आहे.

तालुक्यात आज हिंजवडी, चांदे, मारुंजी व नेरे येथे प्रत्येक १, बावधन येथे २, भूगावला ४, तर पिरंगुट येथे ६ रुग्ण सापडले आहेत. आज बरे होऊन घरी सोडलेल्यांमध्ये १३ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या आता ५८८ झाली आहे. आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. आज अखेर तालुक्यातील मृतांची संख्या २३ आहे. सध्या रुग्णालयात १३९ रुग्ण उपचार घेत आहेत त्यांपैकी १ रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असून अतिदक्षता विभागात ४ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील आजपर्यंत कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सरासरी ७८ टक्के असून मृत्यूचे प्रमाणही सरासरीने ३ टक्के आहे. 

तालुक्यात हिंजवडी आणि पिरंगुट आदी ठिकाणी असलेले औद्योगिक व आयटी पार्क यांमुळे कामगारांचे प्रमाण जास्त आहे. त्यातून हिंजवडी व पिरंगुट आदी परिसरात कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे हिंजवडी येथील केअर सेंटर आणि कासार आंबोली येथे नुकत्यात सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरमुळे मुळशीकरांना नक्कीच लाभदायक व दिलासा देणारे आहे. लवळे येथील सिंबायोसिस येथील रुग्णालयात ५०० बेड उपलब्ध असले, तरी तेथे तालुक्यातील रु्ग्णांकडून बिलाची रक्कम घेतली जाते. शासनाच्या आरोग्य विभागाने शिफारस केली, तरच तेथे सवलतीत अथवा मोफत उपचार केले जातात. काही लोकप्रतिनिधींनी शिफारस केल्यावर बिलात काही प्रमाणात सवलत दिली जाते. परंतु या सिंबायोसिसमध्ये मुळशीकरांसाठी कोरोनाबाधित रुग्णांवर सरसकट मोफत उपचार करावेत, अशी मागणी आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com