कोरोना हा उपचाराविना बरा होणारा किरकोळ आजार; झेडपी सभापतींनी सांगितला स्वत:चा अनुभव

गजेंद्र बडे
Thursday, 6 August 2020

१६ जुलै रोजी त्यांच्या पतीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यामुळे सभापती पारगे यांनी स्वत:सह कुटुंबातील सर्वच व्यक्तींची कोरोना टेस्ट करून घेतली. त्यात त्यांच्यासह सहा जण कोरोनाबाधित आढळून आले होते.

पुणे : कोरोना हा तर सर्दी, ताप आणि हिवताप या आजारांपेक्षाही खूपच किरकोळ आजार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात दाखल होण्याची आवश्यकता नाही. कोरोना हा उपचाराविना घरच्या घरी बरा होणारा आजार आहे, असे कोरोनावर नुकताच विजय मिळविलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती पूजा पारगे सांगत होत्या. 

'जिंदगी मिलके बिताऐंगे'; कलाकारच बनले एकमेकांचे आधार!​

या आजाराबाबतची ही काही ऐकीव माहिती नसून स्वत: घेतलेला अनुभव असल्याचेही सभापती पारगे यांनी यावेळी स्पष्ट केले. पारगे यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सहा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये पती, मुलासह अन्य तिघांचा समावेश होता. या सर्वांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल न होता, त्यांच्या फार्म हाऊसवर स्वत:ला क्वराटांइन करून घेतले होते. हे सर्वजण नुकतेच कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत.

पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असतानाच, शहरालगत असलेल्या गावांनाही याची मोठी झळ बसू लागली होती. पारगे यांचे डोणजे हे गाव शहरालगतच आहे. या गावात कोरोना हळूहळू पाय पसरत असतानाच १६ जुलै रोजी त्यांच्या पतीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यामुळे सभापती पारगे यांनी स्वत:सह कुटुंबातील सर्वच व्यक्तींची कोरोना टेस्ट करून घेतली. त्यात त्यांच्यासह सहा जण कोरोनाबाधित आढळून आले होते.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यात राज्य सरकारचं दुर्लक्ष होतंय; कुणी केला आरोप?​

पारगे म्हणाल्या, "कोरोनाचे निदान झाल्यानंतर सर्वांनाच एक वेळा ताप आला. डोके दुखायला लागले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने केवळ ताप आणि डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्या. मात्र पहिले चार दिवस प्रचंड घाम येत असे. यावर उपाययोजना करण्यासाठी फळांचा रस, फलाहार, दूध आणि अंडी यासारखा सकस आहार घेतला. या आहारामुळे पाचव्या दिवसांपासून आम्ही सर्वजण पूर्ववत बरे झालो. यामुळे सहाव्या दिवशी पुन्हा सर्वांच्या कोरोना टेस्ट घेतल्या. या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या."

कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही त्यापुढील १४ दिवस आम्ही सर्वजण होम क्वॉरंटाइन राहिलो. हा १४ दिवसांचा कालावधी ४ ऑगष्टला संपला असून ५ ऑगष्टपासून नियमित कामकाज सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune ZP Chairperson Pooja Parge said corona is a minor disease that can be cured without any treatment