
कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी आताही धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.
पुणे - कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला. तसेच, १७ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत बालकांना पोलिओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
'भारत बंद'मध्ये पुण्यात काय सुरू राहणार? काय राहणार बंद?
डॉ. देशमुख यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण आणि कोरोना लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी आताही धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे. तसेच, पुढील कालावधीत रुग्णसंख्या वाढल्यास प्रशासनाने तयारी ठेवावी. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच लसीकरणासाठी माहिती संकलित करताना अचूकता ठेवावी.’’ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी कोरोनास्थिती आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली.