esakal | Coronavirus : पुण्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ

बोलून बातमी शोधा

Coronavirus : पुण्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ

- महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

Coronavirus : पुण्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ
sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुणे : भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आता मुंबई, पुणे व पिंपरी-चिंचवड येथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 52 झाली आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र त्यानंतर आता पंजाबमध्येही प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये काही रुग्ण भारताबाहेरील असल्याचे समोर आले आहे. तसेच जे रुग्ण दाखल झाले होते, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, आता त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. 

'निर्भया'ला मिळाला न्याय; जाणून घ्या आठ वर्षांत कधी काय घडलं!

अतिदक्षतेचा रुग्ण असल्यास सरकार खर्च करणार

जर अतिदक्षतेचा रुग्ण असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार करणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

भारतात आत्तापर्यंत 195 प्रकरणं समोर आली असून, यामध्ये 163 भारतीय नागरिक आहेत. तसेच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. याची संख्या 52 झाली आहे.