बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली 107 वर; तर मृतांचा आकडा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

बारामतीतील रुग्णांची संख्या आता 107 वर पोहोचली आहे तर मृतांची संख्या 10 वर.

बारामती : शहरातील कोरोनाचे संकट कमी होण्यास तयार नाही. शहरात आता नियमित कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. रुग्णाच्या संपर्कातील लोकही कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने सर्वांनाच आता चिंता लागली आहे. दरम्यान, शहरातील एका रुग्णाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता शहरातील कोरोनाचा अकरावा बळी गेला. याशिवाय आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे बारामतीतील रुग्णांची संख्या आता 107 वर पोहोचली आहे तर मृतांची संख्या 10 वर गेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

बारामतीमध्ये एकूण 59 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते, त्यापैकी 54 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये बारामती शहरामधील चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये खंडोबा नगरमधील रुग्णाच्या संपर्कातील तिची 65 वर्षाची आई तसेच कसब्यामधील रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षाची महिला व सूर्य नगरी येथील रुग्णाच्या संपर्कातील 31 वर्षाचा पुरुष व संघवी पार्क बारामती येथील 32 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. अजून पाच अहवाल प्रतीक्षेत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आजपासून बारामतीतील लॉकडाऊन समाप्त होत असून, सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले सात दिवस दुकाने बंद असल्याने आज खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळेल असा अंदाज व्यक्त होत आहे. दुकानदारांनी स्वत:ची काळजी घेत दुकानात ग्राहक व दुकानदार यांच्यात अंतर राहिल, अशी रचना करावी, मास्क हँडग्लोव्हजचा वापर करावा, प्रत्येक दुकानदाराने सॅनेटायझर्सचा वापर करावा, येणा-या ग्राहकांचे संपूर्ण नाव, पत्ता व व्यवस्थित मोबाईल क्रमांक लिहावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of COVID 19 patients in Baramati reached 107 and 10 Patients died