विद्यार्थ्यांनो, ऑनलाइन की ऑफलाइन परीक्षा देणार? पर्याय निवडीचा आज शेवटचा दिवस

Pune_University
Pune_University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांची संख्या 55 वरून 110 करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नियोजन सुरू केले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन परीक्षा देणार की ऑफलाईन याचा पर्याय निवडण्यास सांगितले आहे. त्यासाठीची मुदत 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता संपणार आहे. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पर्याय निवडलेला असतानाही ऑनलाइन हाच पर्याय निवडला जात होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. ही तांत्रिक चूक विद्यापीठाने दुरुस्त केली आहे.

पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 89 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. तर सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइनचा पर्याय निवडला आहे. ऑफलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी 55 परीक्षा केंद्रांची यादी विद्यापीठाने जाहीर केली होती, पण यामध्ये विद्यार्थ्यांना किमान 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांनी याविरोधात विद्यापीठाकडे तक्रार केली होती. पुणे शहरात अवघे दोन परीक्षा केंद्र सुरू देण्यात आले, त्यामुळे वेल्हा, भोर, पानशेत या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नगर रस्त्यावरील महाविद्यालयात जाण्याची नामुष्की आली होती, पण आता त्यांच्यासाठी नऱ्हे येथे जेएसपीएम महाविद्यालयात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा केंद्रांची संख्या 110 करण्यात आली आहे. त्यासाठी तयारीला सुरवात केली आहे. गेल्या तीन दिवसात 1 हजार 200 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला, तर चौघांनी ऑनलाइन ऐवजी ऑफलाइनचा पर्याय निवडला आहे. पर्याय निवडीची मुदत 27 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com