दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत जास्त | Adopt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

girl
दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत जास्त

दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत जास्त

पुणे - मुलगी नको म्हणून गर्भपात केला. जन्मानंतर तिला सोडून दिले. दोन किंवा तीन मुली झाल्या म्हणून पत्नीला वाऱ्यावर सोडल्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. मात्र एकीकडे अशी स्थिती असताना अपत्य म्हणून मुलगीच हवी अशी देखील प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळेच दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत जास्त आहे.

‘सोफोश’मधून जानेवारी २०१७ पासून सप्टेंबर २०२१ दरम्यान १९४ मुलं दत्तक घेण्यात आली. त्यातील १२१ मुली तर ७३ मुले आहेत. वंशाचा दिवा हवा म्हणून काही पालकांचा आग्रह असतो की किमान एक तरी मुलगा व्हावा. त्यासाठी नको ते खटाटोप केले जातात. मात्र तरीही मुलगी होणार असल्याचे समजले तर गुपचूप गर्भपात करणे, मुलीचा जन्म झाला तर तिला सोडून देणे किंवा पत्नीला त्रास देणे असे प्रकार होत असतात. मात्र काही आर्इ-वडील असे देखील आहे की ज्यांना मुलं होत नाही. म्हणून ते मुलं दत्तक घेण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यात मुलगा किंवा मुलगी निवडण्याची संधी असते. अशा वेळी मुलगाच हवा असा आग्रह न धरता मुलींचे पालकत्व स्वीकारले जात असल्याचे यातून स्पष्ट होते.

हेही वाचा: पुणे : पुनर्वसनाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगरमधील वाहतुकीत बदल

परदेशी नागरिकांनी ७५७ मुलांना दिले कुटुंब

कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर देशातील मूल परदेशातील नागरिकांना देखील दत्तक घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार १९७४ पासून परदेशातील नागरिकांनी ७५७ मुलं दत्तक घेतली आहेत. त्यात २१३ मुले आणि ५४४ मुली आहेत.

गेल्या पाच वर्षांत मुलगे व मुली यांची वर्गवारी आपण बघू शकतो. त्यातून कुटुंबात दत्तक गेलेली बालके पाहिल्यास सकारात्मक बदल नक्की जाणवतो. अर्थात, संस्था म्हणून ‘सोफोश’ असा फरक करतच नाही. प्रत्येक बाळ आमच्याच कुटुंबाचे असते. त्याची तितक्याच आत्मीयतेने काळजी घेतली जाते.

- अमला पाठक, अध्यक्षा, सोफोश

loading image
go to top