Passport : पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली

शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या वाढलेल्या संधी आणि सुलभ झालेली पासपोर्ट प्रक्रिया यामुळे पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Passport
Passportesakal

पुणे - शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या वाढलेल्या संधी आणि सुलभ झालेली पासपोर्ट प्रक्रिया यामुळे पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते जून दरम्यान पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे.

गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत (जानेवारी ते जून) पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने १ लाख ६३ हजार १०५ पासपोर्टचे वितरण केले होते. यावर्षी याच कालावधीत दोन लाख १९ हजर ६४७ पासपोर्ट वितरित करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे २०२० मध्ये पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या सुमारे तीन लाखांनी घटली होती. लॉकडाउनमुळे काही काळ पासपोर्ट कार्यालय बंद होते; तसेच तातडीने गरज नाही, म्हणून अनेकांनी पासपोर्ट काढण्याचा निर्णय पुढे ढकलला.

त्यामुळे २०२० मध्ये केवळ एक लाख ६५ हजार १८५ अर्ज पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे दाखल झाले होते. त्यातील एक लाख ६१ हजार २९५ पासपोर्टचे वितरण करण्यात आले. मात्र २०२१ पासून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. यंदा त्यात विक्रमी वाढ झाल्याचे दिसते.

तसेच पासपोर्ट सेवा केंद्रातील अपॉइंटमेंटची संख्याही टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. आता पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूरसह इतर जिल्ह्यांतील मुख्य पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) सुरू झाली आहेत.

लॉकडाउनमुळे प्रलंबित राहिलेले पासपोर्टचे नूतनीकरण, पत्ता बदल; तसेच नवीन पासपोर्टसाठी नागरिकांची पासपोर्ट सेवा केंद्रातील वर्दळ वाढली आहे.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानेदेखील गेल्या काही वर्षांत पासपोर्टसाठी आवश्यक अनेक कागदपत्रे कमी केल्यामुळे लोकांचा प्रतिसाद वाढला आहे. पासपोर्ट काढणे म्हणजे एक आव्हान असते, हा गैरसमज दूर झाल्याने लोक एजंट व्यक्तीच्या मदतीशिवाय पासपोर्ट काढत आहेत.

वर्ष - वितरित झालेले पासपोर्ट

२०१७ - ३,४२,५०६

२०१८ - ४,१२, १५३

२०१९ - ४,१७, ७६९

२०२० - १,६६,३४९

२०२१ - २,३१,३३४६

२०२२ - ३,४४,४४७

जुलै २०२२ मध्ये पुण्यात प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून, मी अर्ज स्वीकारल्यापासून पासपोर्ट पाठवण्यापर्यंतच्या प्रक्रियेच्या अनेक टप्प्यांत सुलभता आणण्याचा प्रयत्न करत आहे. रोजच्या पासपोर्ट अपॉइंटमेंटची एकूण संख्या अडीच हजारपर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्व विलंब कमी करण्यासाठी आम्ही मूळ आणि वैध कागदपत्रे आणण्याची आणि नावे व इतर तपशील तंतोतंत सारखेच असल्याची खात्री करतो. त्यानंतर त्वरित पासपोर्ट देण्यात येतो.

- डॉ. अर्जुन देवरे, पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com