पुण्यात कोरोना रुग्णांपेक्षा या रोगाच्या बळींचा आकडा चिंतेचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

पॉझिटिव्ह आढळल्याने लग्नात पळापळ
माळशिरस - लग्नसमारंभ उत्साही वातावरणात सुरू असताना अचानक वऱ्हाडी मंडळींची पळापळ सुरू झाली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण लग्नासाठी उपस्थित असल्याची माहिती मिळताच घबराट पसरली. राजुरी (ता. पुरंदर) येथे आज एक लग्नसमारंभ होता.

पुणे - पुण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा या रोगाच्या बळींचा आकडा चिंतेचा होऊ लागला आहे. रविवारी (ता. २८) दिवसभरात २२ जणांचा मृत्यू झाला असून, आणखी सव्वातीनशे रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ५४ रुग्ण ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, दिवसभरात ५२३ नवे रुग्ण सापडले असून ३३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सहा हजारांहून अधिक जण रुग्णालयात दाखल आहेत. दुसरीकडे मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत ३६३ रुग्णांचा मृत्यू झाला. 

पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

रविवारी मृत्यू झालेल्यांमध्ये १२ महिला आणि १० पुरुष आहेत. मृतांमध्ये ३१ वर्षांच्या महिलेसह अन्य व्यक्ती ४० आणि ५० वर्षांच्या पुढच्या असून, त्यांना अन्यही आजार होते. हडपसर, कात्रज, कर्वेनगर, पांडवनगर, सिंहगड रस्ता, कोंढवा, घोरपडी गाव, पद्मावती, गुरुवार पेठ, लोहगाव, अरण्येश्वर, शिवाजीनगर, बोपोडी, नाना पेठ, रामटेकडी, येरवडा, सिंहगड रस्ता, दापोडी, लष्कर परिसर येथील रुग्णांचा मृत्यू झाला.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

पुण्यात आतापर्यंत एक लाख ८ हजार नागरिकांची तपासणी झाली असून, त्यापैकी १६ हजार १२५ जणांना कोरोना झाला. त्यातील ९ हजार ४४७ रुग्ण बरे झाले असून, ६१२ जणांचा मृत्यू झाला. सध्या ६ हजार ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर

पॉझिटिव्ह आढळल्याने लग्नात पळापळ
माळशिरस - लग्नसमारंभ उत्साही वातावरणात सुरू असताना अचानक वऱ्हाडी मंडळींची पळापळ सुरू झाली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण लग्नासाठी उपस्थित असल्याची माहिती मिळताच घबराट पसरली. राजुरी (ता. पुरंदर) येथे आज एक लग्नसमारंभ होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of victims of this disease is more worrying than the number of corona patients in Pune