पुणे महापालिकेच्या कामावर जलसंपदाचा आक्षेप

नदीकाठ सुधार प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन पुलाच्या दोन्ही बाजूला काम सुरू करण्यात आले आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Summary

नदीकाठ सुधार प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन पुलाच्या दोन्ही बाजूला काम सुरू करण्यात आले आहे.

पुणे - पुणे महापालिकेकडून नदीकाठ सुधार योजनेचे काम सुरू झालेले असताना त्याविरोधात खासदार अँड. वंदना चव्हाण यांनी जलसंपदा विभागाकडे तक्रार केल्यानंतर जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवले आहे. या प्रकल्पाबाबत जोपर्यंत स्वयंसेवी संघटनांच्या आक्षेपांचे निराकरण होत नाही तो पर्यंत काम करू नये असे ठरलेले आहे. त्यामुळे त्यानंतरच काम करणे संयुक्तिक राहील असे पत्र पाठवत कामावर आक्षेप घेतला आहे. मात्र, पुणे महापालिकेने आम्ही ठरलेल्या नियमानुसारच काम करत आहोत, असे स्पष्टीकरण दिले आहे.

नदीकाठ सुधार प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन पुलाच्या दोन्ही बाजूला काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे स्वरूप कसे असेल, त्यात काय सुविधा असतील, पुराचा धोका होणार नही हे नागरिकांना दाखविण्यासाठी प्राधान्याने याचे काम सुरू केले आहे. पण यावर खासदार वंदना चव्हाण यांनी आक्षेप घेत जलसंपदा विभागाकडे तक्रार केली. त्यावर जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवून त्यावर हरकत घेतली.

महापालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख म्हणाले, ‘महापालिकेच्या या प्रकल्पाच्या डीपीआरला जलसंपदा विभाग, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सीएडब्लूपीआरएस) यांची मान्यता आहे. त्यांच्या नियमानुसारच काम सुरू आहे. त्याबाबत जलसंपदा विभागाला आम्ही आमचे म्हणणे मांडू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com