
पुणे - पानिपतचे युद्ध झाल्यानंतर हार न मानता मराठ्यांनी शौर्याने लढून दिल्ली काबीज केली. त्यामुळेच भारताची सीमा सतलज नदीपर्यंत गेली. मराठ्यांनी ३० वर्ष दिल्लीवर राज्य केले नसते, तर देशाची सीमा दक्षीण दिल्लीपर्यंत मर्यादित राहिली असती, असे मत मध्य प्रदेशातील कौशल्य विकास मंत्री यशोधरा राजे शिंदे यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे ‘पानिपतानंतरचा मराठ्यांचा २५० वा दिल्ली विजय दिन’ गणेश कला क्रीडा मंच येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी शिंदे बोलत होत्या. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, माजी खासदार प्रदीप रावत, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, डॉ. उदय कुलकर्णी, पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा, होळकर घराण्याचे वंशज भूषण होळकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संस्थापक सदस्य अतुल बिनीवाले या वेळी उपस्थित होते.
इतिहासातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित करताना शिंदे म्हणाल्या, ‘‘मराठा साम्राज्याने दिल्ली काबीज केली असती तरी या सत्तेचा मेंदू पुण्यात होता. भविष्यातही पुण्याचे महत्त्व कायम राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात आपल्यातील वैर व पूर्वीच्या चुका टाळून एकत्र आले पाहिजे. मी महादजी शिंदे यांची वंशज आहे, त्यांचे रक्त माझ्यामध्ये आहे. पेशव्यांनी त्यांना दिल्ली काबीज करण्यासाठी पाठविले त्याचा मला सार्थ अभिमान आहे.’’
गोखले म्हणाले, ‘‘आताचा भारत बदललेला आहे, आपल्याला कोणी कमजोर समजू नये हे आपण उरी आणि बालाकोटचा बदला घेऊन दाखविले आहे. पाकिस्तान आणि चीन हे भारताचे तुकडे करण्यासाठी एकत्र आले आहेत. आपल्या तरुणांना ड्रग्ज आणि पॉर्नोग्राफीमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यात भांडणे लावली जात आहेत, त्यामुळे आपण सर्व मतभेद दूर करून भारतीय या नात्याने एकत्र आले पाहिजे.’’ सूत्रसंचालन व स्वागत मोहन शेटे यांनी केले.
पानिपत युद्ध झाल्यानंतर अवघ्या १० वर्षांत मराठ्यांनी दिल्लीवर भगवा फडकावला. त्याचा उत्सव आज साजरा करत आहोत. शिवाजी महाराज यांनी जे जे स्वप्न पाहिले ते आपल्याला पूर्ण करायचे आहे.
-पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.