कृषीदिनानिमित्त तक्रारवाडी येथे वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

भिगवण (पुणे) : कृषीदिनाचे औचित्य साधत तक्रारवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी रविवारी (ता.०१) वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी दिवसभर विविध प्रकारच्या ३०० पर्यावरण पुरक वृक्षांची लागवड करत वेगळ्या पद्धतीने कृषीदिन साजरा केला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वंसतराव नाईक यांची जंयती कृषीदिन म्हणुन साजरी केली जाते. कृषीदिनाचे औचीत्य साधत महाराष्ट्र शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचा जो संकल्प हाती घेतला आहे त्यास प्रतिसाद देत तक्रारवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी रविवारी(ता.०१) वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, संरपच शोभा वाघ, उपसंरपच प्रशांत वाघ, माजी सरपंच राजेंद्र वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष सतिश वाघ, संपत बंडगर, दिनेश मारणे, सुनिल वाघ, सचिन वाघ, विलास गडकर, ग्रामसेवक रवींद्र शेलार, बलभीम पिसाळ, राणी परदेशी, मंदाकिनी वाघ, दिपक वाघ, किरण रायसोनी व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.  

पंचायत समिती सदस्य संजय देहाडे म्हणाले, कृषीदिनाचे आौचित्य साधुन तक्रारवाडी गावाने राबवलेला हा वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. गावातील पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ व विदयार्थी यांचा समन्वय साधल्यास उत्कृष्ठ काम होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. यावेळी १० व १२ वी उर्तीर्ण झालेल्या गुणवंत विदयार्थांचा झाडाचे रोपटे भेट देऊ सत्कार केला व त्याही रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच शोभा वाघ, उपसरपंच प्रशांत वाघ यांनी मनोगत व्यक्त करुन लागवड केलेल्या झाडांची जोपासना करण्याचे आवाहन केले.   

Web Title: on the occasion of agriculture day tree plantation in takrarwadi