आंबेडकर जयंतीनिमित्त कायदा-सुव्यवस्था राखा - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य नियोजन करावे. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येणार नाही, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. 

येथील विधान भवन सभागृहात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बापट यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आढावा बैठक झाली. या वेळी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पोलिस सह आयुक्त रवींद्र कदम, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेज हक, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे या वेळी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ""पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. पाण्याच्या टॅंकरचे नियोजन करून पाणीपुरवठा कमी पडणार नाही, तसेच मिरवणुका सुरळीतपणे पार पडतील, असे नियोजन करावे.''

Web Title: On the occasion of Ambedkar Jayanti keep the law and order - bapat