अंगारकीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात जवळपास पंचवीस हजाराहून अधिक भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.

अंगारकी चतुर्थीमुळे लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींची अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त काशीनाथ लोखंडे, जयवंत डोके, संजय ढेकणे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते. 

श्री गिरिजात्मजकाच्या मूर्तीस व मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी सहा  व दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे वतीने भाविक भक्तांना खिचडी वाटप करण्यात आली तसेच विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजनाचा कार्यक्रम झाला. चंद्रोदयाच्या वेळी 9.32 वाजता श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कडक ऊन असल्याने  भाविकांनी सकाळी व सायंकाळी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात जुन्नर परिसर तसेच पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत होते.

जुन्नर तालुक्यास मिळालेल्या विशेष पर्यटन क्षेत्राच्या दर्जाबाबत देवस्थान ट्रस्टचे वतीने आमदार शरद सोनवणे यांचे आभार मानण्यात आले. पर्यटन स्थळांचा विकास होत असताना त्यांचे संवर्धन होणे  गरजेचे आहे. पर्यटकांना विविध आवश्यक सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पर्यटनस्थळाना जोडणारे रस्ते चांगले होणे गरजेचे असून त्याठिकाणी जाण्याकरिता वाहन सेवा सुरू केली पाहिजे. पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी विविध प्रकल्प व उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे  देवस्थानचे अध्यक्ष  गोविंद मेहेर सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी सांगितले.

Web Title: on the occasion of angaraki chaturthi rush on lenyadri