हृद्य सत्काराने ‘त्या’ भारावल्या

हृद्य सत्काराने ‘त्या’ भारावल्या

पुणे - थंडी वा पावसाची कसलीही तमा न बाळगता बाराही महिने घरोघरी वृत्तपत्र पोचविणाऱ्या महिलांचा आज हृद्य सत्कार करण्यात आला.   आपल्या कामाचे झालेले कौतुक, मिळालेला सन्मान यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची आणि समाधानाची लकेर उमटली. हा आनंदोत्सवाचा सोहळा आज बालगंधर्व रंगमंदिरात रंगला.  

जागतिक महिला दिनानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने वृत्तपत्र विक्रेत्या महिला आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित केला होता. महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले, ‘सकाळ’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्र पिसाळ, सहयोगी संपादक रमेश डोईफोडे, तनिष्का मासिकाच्या सहसंपादक मंजिरी फडणीस, ‘साप्ताहिक सकाळ’च्या सहसंपादक ऋता बावडेकर, मुख्य उपसंपादक नयना निर्गुण आदी उपस्थित होते. 

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रेय पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे आणि खजिनदार संजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला. पेठा, सातारा रस्ता, हडपसर, कोथरूड, सिंहगड रस्ता, औंध आणि पिंपरी-चिंचवड विभागातील वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा सन्मान करण्यात आला. वृत्तपत्र वाटप करताना ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झालेले संदीप भंडारी यांचाही गौरव करण्यात आला.  

संघाचे अध्यक्ष पिसे म्हणाले, ‘‘सकाळ समूहातर्फे गेल्या चार वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार होत आहे. विक्रेत्यांना कोणतीही मदत लागली तर ‘सकाळ’कडून सहकार्य केले जाते. महिला दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा सत्कार करून त्यांना पाठबळ दिले.’’

मंजिरी फडणीस म्हणाल्या, ‘‘आम्ही दिवसभर जे काम करतो, ते तुम्ही पहाटे उठून वाचकांपर्यंत पोचविण्याचे कष्ट घेता म्हणून वाचकांना वृत्तपत्र वाचायला मिळते. ‘सकाळ’ कायम तुमच्या सोबत आहे. आमच्या प्रत्येक उपक्रमास आपला पाठिंबा असतो. वृत्तपत्र वाटपाचे काम महिला आनंदाने करतात, याचा अभिमान वाटतो. गेल्या चार वर्षांपासून हा सत्काराचा उपक्रम होत आहे. त्यामुळे अनेकजणी ओळखीच्या झाल्या असून, आपुलकी निर्माण झाली आहे.’’ 

महिला विक्रेत्या अंजली पासलकर म्हणाल्या, ‘‘गेल्या १९ वर्षांपासून मी वृत्तपत्र विक्रेती आहे. ‘सकाळ’ने आमच्या कामाची दखल घेऊन, सत्कार केला याचा अभिमान आहे.’’  

पुण्यात १००-१५० सीए झाले; पण मी वृत्तपत्र विक्रेता असल्याने माझी पहिल्या पानावर बातमी आली. माझ्या यशामागे माझी आई, सकाळ समूह आणि संघटनेचा मोठा हातभार आहे.
- संदीप भंडारी, सीए झालेले वृत्तपत्र विक्रेते

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com