प्रांताधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनेही केले मोठ्या उत्साहात श्रमदान

विजय मोरे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

उंडवडी (पुणे) : पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील माळरानावर मंगळवारी पहाटेच्या पहरी बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली श्रमदान मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, मंडल कृषी अधिकारी पी. एस. जगताप, महसूलचे मंडल अधिकारी एम. पी. सय्यद, गावकामगार तलाठी दिपक साठे, गावच्या सरपंच मंदा सुरेश मोरे, उपसरपंच भाऊसाहेब मोरे, ग्रामपंचायत सदस्य फत्तेसिंग गोंडगे, पोलिस पाटील विद्या वावगे, कृषी सहाय्यक आण्णासाहेब पासले, जे. एन.

उंडवडी (पुणे) : पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील माळरानावर मंगळवारी पहाटेच्या पहरी बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली श्रमदान मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, मंडल कृषी अधिकारी पी. एस. जगताप, महसूलचे मंडल अधिकारी एम. पी. सय्यद, गावकामगार तलाठी दिपक साठे, गावच्या सरपंच मंदा सुरेश मोरे, उपसरपंच भाऊसाहेब मोरे, ग्रामपंचायत सदस्य फत्तेसिंग गोंडगे, पोलिस पाटील विद्या वावगे, कृषी सहाय्यक आण्णासाहेब पासले, जे. एन. कुंभार तसेच पानी फाउंडेशन टिमचे कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी टिकाऊ, फावडे व घमेली हातात घेवून पहाटेच्या पहरीपासून सकाळपर्यंत मोठ्या उत्साहात श्रमदान केले. 

येथील श्रमदानात अधिकारी व ग्रामस्थांनी पन्नास मीटर लांबीची (सी. सी. टी.)सलग समतल चर एक तासात खोदून पूर्ण केली. विशेष म्हणजे सोनवडी गावची यात्रा असतानाही गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या उत्साहाने पहाटेपासून श्रमदानात सहभागी झाले होते.

जळगाव सुपे येथेही प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे व तालुका कृषी अधिकारी संतोशकुमार बरकडे यांनी ग्रामस्थांसमवेत श्रमदान केले. यावेळी सरपंच रुपाली खोमणे यांच्यासह पानी फाउंडेशन टिमचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी श्रमदान केले. 

Web Title: officers and agriculture officers do shramdan