कासारवाडी पाणीपुरवठा कार्यालयात अधिकाऱ्यांनाच कोंडले कारण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

कासारवाडीसह, दापोडी, फुगेवाडी भागातही पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, कनिष्ठ अभियंता किरण अंदुरे, शशिकांत दवंडे या अधिकाऱ्यांना विस्कळित पाणीपुरवठाप्रकरणी चार तासांपासून पाणीपुरवठा कार्यालयाच्या खोलीत कोंडून ठेवण्यात आले आहे.

पिंपरी : मागील चार दिवसांपासून विस्कळित पाणीपुरवठा होत असल्याने कासारवाडीतील पाणीपुरवठा कार्यालयात अधिकाऱ्यांना नागरिकांनी कोंडले. नागरिकांना पिण्यासाठीही पाणी नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. ही घटना शनिवारी सकाळी (ता.1) साडे दहाच्या सुमारास घडली. 

हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका: दिला 'हा' आदेश

कासारवाडीसह, दापोडी, फुगेवाडी भागातही पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, कनिष्ठ अभियंता किरण अंदुरे, शशिकांत दवंडे या अधिकाऱ्यांना विस्कळित पाणीपुरवठाप्रकरणी चार तासांपासून पाणीपुरवठा कार्यालयाच्या खोलीत कोंडून ठेवण्यात आले आहे. दिवसाआड पाणीपुरवठा होऊनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही झालाच नाही, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठीही पाणी नसल्याने नागरिकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर गाऱ्हाणी मांडली.

पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

नगरसेविका आशा शेंडगे म्हणाल्या,''चार दिवसांपासून पाणीच नसल्याने नागरिकांचे रात्री-अपरात्री कधीही फोन येत आहेत. सर्वांची घरातील कामे अडकून पडली आहेत. पाणीपुरवठा सुरळीत केल्याशिवाय अधिकाऱ्यांना खोलीतून सोडणार नाही.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers are locked at Kasarwadi water supply office due to irregular water supply

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: