esakal | ग्रामस्थांच्या गांधीगिरीने अधिकारी माघारी
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थ

ग्रामस्थांच्या गांधीगिरीने अधिकारी माघारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केसनंद : पूर्व हवेलीत बाधित शेतकऱ्यांचा रिंगरोडला विरोध कायम असून, शिरसवडी येथे मुरकुटे नगरात रिंगरोडच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बाधित ग्रामस्थ व विकास आराखडा विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी पद्धतीने समजावत व सत्कार करून परत पाठवले.

हेही वाचा: बजाजच्या लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार

रिंगरोडच्या मोजणीसाठी शिरसवडीत अधिकारी आल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थांसह पंचायत समिती सदस्य श्‍यामराव गावडे, विकास आराखडा विरोधी कृती समितीचे सरचिटणिस संदीप भोंडवे, विजय पायगुडे हे तत्काळ तेथे पोहचले. या सर्वांनी गांधीगिरी पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांचे म्हणणे मांडले. तसेच, त्यांचा सत्कार करून त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित अधिकारी निघून गेले. बाधित शेतकऱ्यांची भूमिका मांडताना भोंडवे म्हणाले, ‘‘विकास आराखड्यास आणि रिंगरोड व रेल्वे महामार्गास स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी हरकत घेतलेली आहे. त्या हरकतीचे निरसन होण्याअगोदरच आगाऊ मोजणी करणे, हा मनमानी कारभार शेतकरी सहन करणार नाहीत. बाधित शेतकऱ्यांचे समाधान होईपर्यंत कोणतीही संपादन प्रक्रियाही पूर्व हवेलीत होऊ देणार नाही. विरोधासाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेण्यासही शेतकरी मागे-पुढे पाहणार नाही.’’

हेही वाचा: न्यायालय इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल- दत्तात्रय भरणे

श्‍यामराव गावडे म्हणाले, ‘‘पंचायत समिती सदस्य म्हणून शेतकरी बांधवांच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध आहे. शेतकरी हिताचा विचार झाल्याशिवाय इंचभरही जमीन शासकीय अधिकाऱ्यांना मोजू व घेऊ देणार नाही. उलट शासनाने प्रकल्प बाधित ग्रामपंचायतीसोबत संपर्क करून प्रकल्पाबाबत माहिती द्यावी व संबंधित गावांच्या हरकतीचेही समाधान करावेत.’’

loading image
go to top