esakal | बजाजच्या मोहिमेत विक्रमी लसीकरण; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

बजाजच्या लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार

बजाजच्या लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ३१ ऑगस्ट रोजी बजाज कोविड १९ मेगा लसीकरण दिवस साजरा करण्यात आला. बजाज कंपनीकडून एक लाख पन्नास हजार डोसेस कोविशिल्ड आणि त्यासाठी लागणाऱ्या एक लाख सत्त्याहत्तर हजार एडी सिरींजेस उपलब्ध करून दिल्या. त्याबरोबरच लसीकरण झाल्यानंतर फोटो काढण्यासाठी ५०० सेल्फी स्टँड व लसीकरणा विषयी माहिती देणारे ५०० स्टँन्डी बजाज कंपनीकडून देण्यात देण्यात आले होते.

पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात ५५९ लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती व त्यात २२३६ कर्मचारी कार्यरत होते. बजाज कंपनीकडून १,५०,००० डोसेस व शासनाकडून ६७, १२० डोसेस असे एकूण १,९३,१७३ डोस देण्याचा विक्रम झाल्याने या मोहिमेकरिता ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचा सत्कार ३ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा परिषद कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे आदी मान्यवर उपस्थित असल्याची माहिती विस्तार अधिकारी व माध्यम प्रमुख धनंजय घाटे यांनी दिली.

हेही वाचा: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

बजाज ग्रुपच्या विशेष सौजन्याने व जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा निर्मलाताई पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद (काका) काकडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या विशेष प्रयत्नाने दिलेल्या लसीचे सुपर फास्ट महा-लसीकरण. "बजाज लसीकरण दिवस" म्हणून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत सर्व १३ तालुक्यामधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्राचे हद्दीतील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस व दुसरा डोस देण्यात आला.

सर्वसाधारण क्षेत्रात :

  • लोणावळा नगरपालिका ४५८५ डोसेस, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र ३७३० डोसेस

  • महिला रुग्णालय बारामती ३३६० डोसेस

  • आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रांजणी उपकेंद्रात ३२८४ डोसेस.

हेही वाचा: पिंपरीत रविवारी लसीचा दुसरा डोस मिळणार ‘ऑन द स्पॉट’

आदिवासी, दुर्गम क्षेत्रात :

  • आंबेगाव तालुक्यातील तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तेरुंगण उपकेंद्रात ३५२ डोसेस,

  • जुन्नर तालुक्यातील आपटाळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाडळी उपकेंद्रात २२६ डोसेस,

  • खेड तालुक्यातील डेहणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नायफड उपकेंद्रात १५६ डोसेस.

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तेरुंगण उपकेंद्रांतर्गत कोंढवळ येथे पावसात नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावण्यात आल्याची बातमी सकाळ वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली होती. त्याच ठिकाणी सर्वाधिक लसीकरण झाल्याने तेथील आरोग्य सेविका सुनंदा काटळे यांचा सत्कार मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

-अविनाश घोलप

loading image
go to top