पुणे - बदलीचा आदेश हातात असूनही नव्या विभागात रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या पुणे महापालिकेतील तीन कर्मचाऱ्यांना अखेर प्रशासनाने दणका दिला आहे. महिनाभर जुन्याच विभागात काम सुरू ठेवणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यात येत आहे..महापालिकेच्या मिळकत कर विभागात सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती भांडार, तसेच मुख्य लेखा व वित्त विभागात बदली करण्यात आली होती. बदलीनंतर निर्धारित वेळेत नवीन विभागात रुजू होण्याऐवजी त्यांनी मिळकत कर विभागातील काम सुरूच ठेवले. त्यामुळे प्रशासनाच्या बदली आदेशाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले..बदली झाल्यानंतर कर्मचारी संबंधित विभागात रुजू झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र, नोटीस मिळाल्यानंतरही त्यांनी जुन्या विभागातील काम सोडले नाही. त्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. बदलीनंतरही जुन्या विभागातच का थांबले, याबाबत त्यांनी जाब विचारला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास भाग पाडण्यात आले..बड्या अधिकाऱ्याचा वरदहस्त?या कर्मचाऱ्यांची बदली झाली तरी परत जुन्या विभागातच त्यांनी कार्यरत राहावे यासाठी एका बड्या अधिकाऱ्याचा वरदहस्त होता. त्यामुळेच हे कर्मचारी मिळकत कर विभाग सोडण्यास तयार नव्हते. पण नायर यांनी चौकशी सुरू केल्याने महापालिकेतील अशा अडमुठ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा प्रशासनात सुरू आहे. पण त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. तसेच जे कर्मचारी बदलीनंतर पुन्हा जुन्या खात्यात येण्यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून दबाव आणत आहेत त्यांनाही या कारवाईतून इशारा देण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.