Pune Municipal Corporation : हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

रस्ते खोदाईची कामे वेळेत व योग्य पद्धतीने करण्याचा पालिकेचा आदेश , शहरात वेगवेगळ्या भागांत सुरू असलेल्या रस्ते खोदाईच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे : शहरात वेगवेगळ्या भागांत सुरू असलेल्या रस्ते खोदाईच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्ते खोदाईचे काम नियोजित वेळेत व योग्य पद्धतीने पूर्ण झाले का? खोदाईनंतर रस्ता पूर्ववत केला आहे का? याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यामध्ये हयगय होत असल्याचे आढळल्यास पथ विभागासह पाणी पुरवठा व मलनि:स्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांवरही आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Pune Municipal Corporation
Pune Crime : सराईत गुन्हेगार अविनाश धनवेच्या खूनप्रकरणी चारजणांना अटक

शहरात पाणीपुरवठा, पावसाळी गटारे, मलनि:स्सारण अशा वेगवेगळ्या कामांसह वीज वाहिन्या, इंटरनेट केबल, एमएनजीएल यांसारख्या विविध प्रकारच्या सेवा वाहिन्यांसाठी रस्त्यांची खोदाई केली जाते. उन्हाळ्यामध्ये अशा कामांचे प्रमाण वाढते. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, पेठांमध्ये ठिकठिकाणी खोदाईची कामे सुरू होतात. त्यामुळे नागरिकांना वाहने चालविणे, पायी जाण्यासही मोठी कसरत करावी लागते. खोदाईनंतर खड्डे बुजविण्याचे काम व्यवस्थित केले जात नाही. पावसाळ्यात त्याच ठिकाणी खड्डे तयार होऊन नागरिकांना आणखी त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

या पार्श्‍वभूमीवर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी संबंधित कामांचा आढावा घेऊन पथ विभागाला रस्त्यांवरील खोदाईची कामे परवानगीनुसार वेळेतच पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या आहेत. खोदाईची कामे परवानगीनुसार तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार झाली नाहीत, तसेच खोदाईनंतर रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याचे पाहणीमध्ये आढळले नाही, तर संबंधित पथ विभागातील कनिष्ठ अभियंता व उपअभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पथ विभागाबरोबरच पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंत्यांवरही कारवाई करण्यात येणार आहेत.

रस्त्यांच्या खोदाईचे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने तसेच खोदाईनंतर व्यवस्थित दुरुस्त केले जात नसल्याने नागरिकांना त्रास होतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संबंधित काम नियोजित वेळेत पूर्ण न करणाऱ्या पथ विभागासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

-विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com