गायीच्या दुधात तेलाची भेसळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - गायीच्या साडेपाच हजार लिटर दुधात तेलाची भेसळ केल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने सोमवारी (ता.2) दिला आहे. त्यामुळे ही भेसळ करणाऱ्या श्‍लोक डेअरीचा (कवठे यमाई, ता. शिरूर) परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रद्द केला आहे. 

दुधात भेसळ होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर 16 ऑक्‍टोबरला दूध डेअरीवर छापा टाकण्यात आला होता. त्या वेळी तेथील दुधाचे नमुने काढून तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल आज "एफडीए'ला मिळाला. 

त्याबाबत माहिती देताना सहायक आयुक्त (अन्न) अर्जुन भुजबळ म्हणाले, ""श्‍लोक डेअरीतील गायीच्या दुधात रिफाइन सोयाबीन तेलाची भेसळ होत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या डेअरीतील सुमारे साडेपाच हजार लिटर दूध होते. त्याचे नमुने घेऊन इतर दूध नष्ट केले होते. 16 ऑक्‍टोबरला या डेअरीचे मालक राजेश पांडुरंग सांडभोर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर तातडीने या डेअरीचा परवानाही रद्द करण्यात आला.'' 

"एफडीए'च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अजित मैत्रे, एस. एस. सावंत आणि वाय. टी. टेंबरे यांनी ही कारवाई केली. 

सहा लाखांचा दंड 
पुणे विभागात अप्रमाणित दुधाबाबतची 38 प्रकरणे निकाली काढली असून, त्यात सहा लाख 86 हजार 816 रुपये दंड करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त संपत देशमुख यांनी दिली.

Web Title: Oil adulteration of milk cows