esakal | पुणे : भरधाव रिक्षाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Old aged woman dies Rickshaw accident

रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेस भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन वृद्ध महिलेचा मृत्यु झाला. ही घटना सातारा रस्त्यावरील कात्रज येथील हॉटेल कोकणरत्न हॉटेलसमोर 17 फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रिक्षाचालकास अटक केली. 

पुणे : भरधाव रिक्षाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसेवा

पुणे : रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेस भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन वृद्ध महिलेचा मृत्यु झाला. ही घटना सातारा रस्त्यावरील कात्रज येथील हॉटेल कोकणरत्न हॉटेलसमोर 17 फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रिक्षाचालकास अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरस्वती नारायण पोळेकर (वय 72, रा. मांगडेवाडी, कात्रज ) असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. शंकर नामदेव भोसले (वय 45, रा. भिलारेवाडी, कात्रज) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. रोहिदास बोडके (वय 19, रा. आंबेगाव ) यांनी फिर्याद दिली.

एक वर्षाच्या बाळाला घेऊन महिला कॉन्स्टेबल करतेय ट्रम्प यांच्या सुरक्षेचे काम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सासू सरस्वती पोळेकर या 17 फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजता सातारा रस्त्यावरील एका पान टपरीमध्ये मिश्री आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या माघारी येताना रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी भोसले हा त्याच्या ताब्यातील रिक्षा भरधाव चालवित होता. त्याच्या रिक्षाची पोळेकर यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे पोळेकर या खाली पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले. 

loading image