जुनी सांगवीत सायक्लॉथॉन फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद 

Old-fashioned cyclothon ferris spontaneous response
Old-fashioned cyclothon ferris spontaneous response

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने सायक्लॉथॉन सायकल फेरीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जुनी सांगवी येथील महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपुला शेजारील सांगवी फाटा येथे बीआरटीएस मार्गावरून सांगवी फाटा ते साई चौक जगताप डेअरी असे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बीआरटीएस मार्गावरून या सायकल फेरीची सुरुवात करण्यात आली.

भारत सरकारच्या स्वच्छ भारत-स्वस्थ भारत या अभियानांतर्गत इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज या भारत सरकारच्या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये ध्वनी, हवा, प्रदूषण टाळून इंधन बचती बरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सायक्लॉथॉन सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तरुण पिढीमध्ये व सध्या कोवीड सारख्या परिस्थितीत व्यायामाचे महत्त्व पटवून देणे हा यामागील उद्देश असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यास नियमित सायकलपटू हौशी सायकलपटू व इतर नागरिकांनीही आपला उस्फुर्त सहभाग नोंदवत या सायकल फेरीत सहभाग घेतला.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, आमदार लक्ष्मण जगताप आदींसह प्रशासनातील अधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी नियमित सायकलपटू,हौशी सायकलपटू व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत या सायकल फेरीत सहभाग नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com