जुन्या कात्रज बोगद्यावर धोकादायक दरडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

खेड शिवापूर - गेल्या वर्षभरापासून कात्रज जुन्या बोगद्यावरील दरडी धोकादायक झाल्या आहेत. जास्त पावसात या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी एखादी दुर्घटना झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

पुण्याहून आल्यानंतर कात्रज बोगद्याच्या प्रवेशद्वारावरील दरडी धोकादायक झाल्या आहेत. येथील वरच्या बाजूचा डोंगराचा मोठा भाग कोसळलेला आहे. त्यामुळे बाजूच्या डोंगराचा भाग निसटता आणि मोकळा झाला आहे. संततधार पावसात पाणी झिरपून येथील दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ चढ आणि वळण असल्याने येथून जाणारी-येणारी वाहने सावकाश जातात. तसेच येथील बाहेरच्या बाजूला आपली वाहने थांबवून अनेक नागरिक येथील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत असतात. त्यांच्यासाठी या दरडी जास्त धोकादायक आहेत. गेल्या वर्षभरापासून येथील दरडींची अशी धोकादायक अवस्था झाली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या या दुर्लक्षामुळे भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या धोकादायक दरडींवर आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

Web Title: Old-Katraj-tunnel dangerous landslide issue