सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

आंबेडकरनगर येथे राहात असलेले शारदाबाई आणि राजेश मार्केटयार्डमधील भाजी मार्केटमध्ये काम करतात. राजेश आणि त्यांची पत्नी राजश्री (सर्व नावे बदललेले) यांच्यात अनेक वर्षे वाद सुरू होता.

पुणे : घटस्फोट झाल्यानंतरही सुनेनं कुलूप तोडून वृद्ध सासूच्या घरातील एक रूम बळकावली. तुला या घरात राहता येणार नाही, असे सासू आणि पती वारंवार तिला सांगत होते. मात्र, तिने तरीही घर सोडले नाही. तिचा हा सर्व प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी कायद्यावर बोट ठेवत तिला घर सोडण्याची विनंती केली. त्यामुळे अखेर वृद्ध सासू आणि पतीला घराचा पूर्ण ताबा मिळाला. 

उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार!

आंबेडकरनगर येथे राहात असलेले शारदाबाई आणि राजेश मार्केटयार्डमधील भाजी मार्केटमध्ये काम करतात. राजेश आणि त्यांची पत्नी राजश्री (सर्व नावे बदललेले) यांच्यात अनेक वर्षे वाद सुरू होता. तो वाद मिटत नसल्याने राजश्री 2013 पासून माहेरी राहत होत्या. नांदायला यावे यासाठी राजेश यांनी पत्नीला नोटीस बजावली होती. मात्र ती नांदण्यास न आल्याने राजेश यांनी 2014 साली घटस्फोटासाठीचा दावा दाखल केला. तो दावा 3 फेब्रुवारी रोजी मंजूर होत त्यांचा घटस्फोट झाला. 

केंद्र सरकारला पथक पाठवायचं असेल तर पाठवावं; अहवाल देण्याची उपमुख्यमंत्र्यांची तयारी​

घटस्फोटानंतर सासूच्या घरात राहता येत नाही : 
लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी राजश्री यांनी सासू आणि पती राहत असलेल्या घराचे कुलूप तोडून एका रुमचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता. याबाबत शारदाबाई आणि राजेश यांनी राजश्री विरोधात पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने दोघांनी जन अदालत संस्थेला हा प्रकार कळवला. घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला अशा प्रद्धतीने ताबा घेता येत नाही. शिवाय ते घर सासूच्या नावावर आहे, ही बाब संस्थेने मार्केटयार्ड पोलिसांच्या लक्षात आणून दिली. 

राजेश आणि राजश्री यांच्या घटस्फोटाचा अर्जात घराबाबत अर्ज नव्हता. तर मुळात ते घर शारदाबाई यांच्या नावावर आहे. त्यामुळे मूल आणि सुनेचा घटस्फोट झाल्यानंतर सुनेला सासूच्या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. ही बाब आम्ही पोलिसांच्या लक्षात आणून दिली आणि त्याबाबतची कागदपत्रे सादर केली. त्यानंतर राजश्री घर सोडण्यास तयार झाल्या. 
- सागर नेवसे, अध्यक्ष, जनअदालत संस्था

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old lady has finally got possession of house seized by her daughter in law

Tags
टॉपिकस
Topic Tags: