भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

 Road accident.jpg
Road accident.jpg

पुणे : रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या वृद्धास भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. फातिमानगर परीसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

रघुनाथ शंकर बधे (वय 75, रा.विठ्ठल मंदिराजवळ, वानवडी) असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अवनीत विनोद भंडारी (वय 36, मोर्चा अपार्टमेंट, एनआयबीएम रोड, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पंकज बधे (वय 25, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे आजोबा रघुनाथ बधे हे शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक या दरम्यानच्या रस्त्यावरील गुरुकुल नर्सरी स्कूलसमोरील हॉटेल साईसागरजवळून जात होते. त्यावेळी अवनीत भंडारी हा त्याची दुचाकी भरधाव चालवित असताना त्याच्या दुचाकीने बधे यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये बधे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com