...और दोस्त बन गए

Old-People
Old-People

पिंपरी - ‘कोई सुरत से है। कोई कोलकाता से। और कोई कहाँकहाँ से। हर दिन घुमने आते थे। जरा मुस्कारये, हाथ से हाथ मिलाये और दोस्त बन गए।...’ ही भावना आहे पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये दररोज सकाळी व सायंकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठांची. जो आला नाही, त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि आयुष्याच्या सायंकाळी गप्पांमध्ये रंगणाऱ्या सेवानिवृत्तांचे.

पिंपळे सौदागर. साधारणतः दहा वर्षांपूर्वी गावठाण आणि शेतीने हिरवागार झालेला परिसर. आता आयटीयन्सचे निवासस्थान, टोलेजंग इमारती, गृहनिर्माण सोसायट्या आणि सुविधांमुळे युरोप-अमेरिकेतील शहरांनाही मागे टाकेल, असे झाले आहे. प्रशस्त रस्ते व व्यापारी संकुलांमुळे शॉपिंग डिस्टिनेशन झाले आहे. तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने ‘स्मार्ट’पणा वाढतो आहे. 

कट्टा एक, भाषा अनेक
वेगवेगळ्या प्रांतातील तरुणाई नोकरीनिमित्त शहरात आली. अनेकांनी पिंपळे सौदागरला हक्काचं घर घेतलं. कालांतराने त्यांचे पालक आले. वेगवेगळी संस्कृती जपणारे. बंगाली, गुजराती, 

कन्नड, तेलुगू, मल्ल्यालम, तमीळ, हिंदी, इंग्रजी भाषा बोलणारे. जोडीला मराठीही. या सर्व भाषा ऐकायला मिळाल्या पिंपळे सौदागरच्या लिनियर गार्डनमध्ये. फिरायला येणाऱ्या ज्येष्ठांमुळे. यातील बहुतांश वेगवेगळ्या क्षेत्रांत, प्रशासनात उच्चपदावर काम करून सेवानिवृत्त झालेले. 

जागरूक, नम्र अन्‌ संवेदनशील
कट्ट्यावर बसलेल्या ज्येष्ठांचे छायाचित्र घेत असताना, त्यांनी हाताने खुणावून जवळ बोलावले. ‘‘फोटो क्‍यूं खिच रहे हो।’’ असे विचारले. ‘‘आम्ही पत्रकार आहोत,’’ असे सांगून छायाचित्र घेण्याचे कारण सांगितले. लगेच दुसरे आजोबा म्हणाले, ‘‘प्लीज, शो युवर आयकार्ड.’’ ओळखपत्र पाहून ते म्हणाले, ‘‘प्लीज, बैठीये.’’ एका ज्येष्ठांनी थोडं सरकून बसायला जागा दिली आणि आमच्या गप्पा रंगल्या. मूळचे सुरत येथील आजोबा म्हणाले, ‘‘मै बिहार के बार्हर्वा मे सर्विस करता था। उशी शहर में ये साहब थे। इन्हे मिलकर खुशी होई. पुरानी बातें याद आ गई।’ (बार्हर्वा आता झारखंडमध्ये आहे.) ‘‘आपका कौनसा गाँव।’’ असे विचारताच दुसरे आजोबा म्हणाले, ‘‘कोलकाता.’’ त्यावर सुरतवाले आजोबा म्हणाले, ‘‘हम लोग कहाँकहाँ से है। कोई सुरत से है। कोई कोलकाता से।’’ ‘‘आपकी पहचान कैसे हुई।’’ असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘हर दिन घुमने आते थे। थोडे मुस्कराये। हाथ से हाथ मिलाये और दोस्त बन गए।...’’ त्यातच मराठी आजोबा माझ्याशी हिंदीत बोलले. म्हणाले, ‘‘हम लोग हरदिन सुबह-शाम यहाँ आते है। सुबह हास्यक्‍लब चलता है। आनंद मिलता है।’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com