पारगावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्द ठार

सुदाम बिडकर
शनिवार, 12 जानेवारी 2019

पारगाव (पुणे)  : पारगाव (ता. आंबेगाव) येथील माळीमळा येथे आज शनिवारी पहाटे चोरट्यानी दरोडा टाकून वृध्द दांपत्यास निघृण मारहाण केली. यामध्ये धारधार हत्याराचा वर्मी घाव बसल्याने कुशाबा पिराजी लोखंडे(वय-80)यांचा मृत्यु झाला तर त्यांची पत्नी सुमन कुशाबा लोखंडे (वय-72)या गंभीर जखमी झाल्या. चोरट्यांनी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख सात हजार असा एकुण एक लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.

पारगाव (पुणे)  : पारगाव (ता. आंबेगाव) येथील माळीमळा येथे आज शनिवारी पहाटे चोरट्यानी दरोडा टाकून वृध्द दांपत्यास निघृण मारहाण केली. यामध्ये धारधार हत्याराचा वर्मी घाव बसल्याने कुशाबा पिराजी लोखंडे(वय-80)यांचा मृत्यु झाला तर त्यांची पत्नी सुमन कुशाबा लोखंडे (वय-72)या गंभीर जखमी झाल्या. चोरट्यांनी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख सात हजार असा एकुण एक लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या पारगाव येथील माळीमळ्यात भरवस्तीत कुशाबा लोखंडे व सुमन लोखंडे हे दांपत्य राहतात. त्यांचा मुलगा मुबंई येथे असल्याने घरात दोघेच असतात. आज पहाटे दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास मागील बाजुकडुन घराची कौल उचकटुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कदाचित आवाजाने जाग आल्याने झोपलेल्या लोखंडे दांपत्यांनी चोरांच्या कृत्याला प्रतिकार करताच कुशाबा लोखंडे यांच्या मानेवर व छातीवर धारदार 
हत्याराने वार केल्याने गंभीर जखमी झाले. पत्नी सुमन सोखंडे यांनाही मारहाण झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

सुमन लोखंडे यांनी आरडा-ओरडा केल्याने शेजारीच राहत असलेले चंद्रकांत लोखंडे, दिलीप लोखंडे, श्रीकांत लोखंडे, सागर लोखंडे, बाबु लोखंडे, शशी लोखंडे व जिल्हा दुध संघाचे संचालक दौलत लोखंडे व मळ्यातील ग्रामस्थ व तरुण मदतीसाठी धाऊन आले. गंभीर जखमी लोखंडे दांपत्यांना उपचारासाठी मंचर येथे नेले उपचारापुर्वीच कुशाबा लोखंडे यांचा मृत्यु झाला. सुमन लोखंडे यांच्यावर मंचर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चोरट्यांनी सुमन लोखंडे यांच्या अंगावरील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे,रोख सात हजाराची रक्कम चोरुन नेली. चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलुप तोडुन सामानाची उचकापाचक केली परंतु कपाटातील चोरी गेलेल्या ऐवजांचा तपशील समजु शकला नाही. 

पोलिस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप जाधव ,पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे, मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ व गुन्हे अन्वेशणचे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र मांजरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या दृष्टीने योग्य त्या सुचना दिल्या आहेत. दुर्गा श्वानाने दोन किलोमीटर अंतरापर्यंत माग काढला आहे. ठसे तज्ञांनीही वस्तुवरील ठशांचे नमुणे घेतले आहेत. मळ्यातील इतरही दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला परंतु त्या ठिकाणी कोणताही ऐवज चोरीला गेला नाही मात्र जवळील कारवस्तीवरील सत्यवान बाबुराव टाव्हरे यांची एम. एच.14 सी.एच.2249 ही स्पेलडंर गाडी घरासमोरुन आज पहाटेच चोरीला गेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old men killed in robbers attack in pargav