विद्यापीठात सव्वादोनशे वर्षे जुने पेंटिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाना फडणवीस, माधवराव पेशवे, महादजी शिंदे यांचे सव्वादोनशे वर्षे जुने पेंटिंग असल्याचे समोर आले आहे. स्कॉटलंड येथील चित्रकार जेम्स वेल्स यांनी 1792 मध्ये हे चित्र काढल्याचा उल्लेख त्यावर आहे. या चित्राला 1865 मध्ये नवे रूप देण्यात आले होते.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत हे पेंटिंग होते. या इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर विद्यापीठातील एका संघटनेच्या कार्यालयात हे पेंटिंग पडून होते. आता आंतरराष्ट्रीय केंद्रात ते सुरक्षित ठेवण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे याबाबत म्हणाले, ""विद्यापीठ हे पेंटिंग जतन करणार आहे. मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यानंतर पेंटिंग आणि इतर वस्तू पूर्ववत त्याच जागेवर लावण्यात येतील.''

Web Title: old painting in University