जुनी सांगवीतील खड्डे बुजविण्यास सुरवात

रमेश मोरे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आधीच खड्डेमय असलेल्या रस्त्याची संतधार पावसाने खड्डे पडून चाळन झाली या रस्त्यावर नागरिकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता औंध, पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा असल्याने सकाळी व रात्री चाकरमानी मंडळीची रहदारी मोठ्या प्रमाणावर असते.

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळानदी काठच्या रस्त्यावर संततधार पावसाने पडलेल्या खड्डे दुरूस्तीचे काम पालिका स्थापत्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. याबाबत 'सकाळ'मधून गुरूवार (ता. २३) सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

आधीच खड्डेमय असलेल्या रस्त्याची संतधार पावसाने खड्डे पडून चाळन झाली या रस्त्यावर नागरिकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता औंध, पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा असल्याने सकाळी व रात्री चाकरमानी मंडळीची रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. तर याच रस्त्यावर एक शाळा, उद्यान असल्याने शाळकरी मुले, नागरीकांना खड्यातून मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. वारंवार विविध विकास कामासाठी या रस्त्याचे खोदकाम करून येथील डागडुजी करण्यात आली होती. मात्र संततधार पावसामुळे पुन्हा हा रस्ता खड्डेमय झाला आहे. खड्ड्यांमुळे गाड्या घसरून पडण्याचे प्रकारही येथे वारंवार घडले आहेत.

याबाबत नागरीकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर जेट पँचर तंत्राच्या साह्याने गतमहिन्यातच येथील खड्डे दुरूस्त करण्यात येवुनही गेल्या आठवड्यात पावसाने पुन्हा खड्डे पडल्याने नगरसेवक संतोष कांबळे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. येथील संगमनगर ते शितोळेनगर शिवांजली कॉर्नर या भागातील रस्त्यावरील मोठे खड्डे जेट पँचर तंत्राच्या साह्याने बुजविण्याचे काम स्थापत्य विभागाकडुन सुरू करण्यात आले आहे. मात्र छोट्या छोट्या खड्डयांचे काय? हा रस्ता पालिका कधी करणार असा प्रश्न नागरीकांमधुन विचारला जात आहे.
 

Web Title: The old patchwork has begun at juni sangvi road