जुनी सांगवीतील शाळेत विद्यार्थ्यांनी केले 'फुल टू स्मार्ट'चे स्वागत

रमेश मोरे
गुरुवार, 28 जून 2018

'फुल टू स्मार्ट' स्पर्धा ही केवळ बक्षिस देण्यासाठी न ठेवता विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड वाढावी, याकडे लक्ष दिल्याबद्दल सकाळ माध्यम समूहाचे मन:पूर्वक आभार. यापूर्वीच्या काळात 'सकाळ'ने विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर लीडर व इतर अनेक स्पर्धा यशस्वीरित्या राबविल्या आहेत.

जुनी सांगवी : 'सकाळ'वतीने सुरू करण्यात आलेल्या 'फुल टू स्मार्ट' या सदराचे विद्यार्थ्यांमधून उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. जुनी सांगवीतील कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळा व शाळा संलग्न सर्व शाखांच्या वतीने आज (गुरुवार) शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी 'फुल टू स्मार्ट'चे प्रात्यक्षिक केले. 

यावेळी विद्यार्थ्यांना सकाळ समूहाचे सहाय्यक वितरण प्रतिनिधी योगेश घाग यांनी "फुल टु स्मार्ट, या स्पर्धेचे नियम, अटी व बक्षिसांबाबत माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी माने यांनी सकाळच्या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, सकाळ नेहमीच सर्वच क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत असते. बक्षिस मिळते म्हणून नव्हे तर या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनात भर पडणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. तर शिक्षिका हेमलता नवले म्हणाल्या, विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरच्या जगाचे आकलन या स्पर्धेतून करता येणार आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला पक्का होऊन सामोरे जाईल.

दत्तात्रय जगताप म्हणाले, 'फुल टू स्मार्ट' स्पर्धा ही केवळ बक्षिस देण्यासाठी न ठेवता विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड वाढावी, याकडे लक्ष दिल्याबद्दल सकाळ माध्यम समूहाचे मन:पूर्वक आभार. यापूर्वीच्या काळात 'सकाळ'ने विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर लीडर व इतर अनेक स्पर्धा यशस्वीरित्या राबविल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक जीवनात नक्कीच फायदा होईल. यावेळी संस्थेचे रामभाऊ खोडदे, परशुराम मालुसरे आदी उपस्थित होते.

Web Title: Old Sangvi School Full 2 Smart Contest Good Response